ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल!

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2024, 11:19 AM IST
ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल! title=
Gold Rate Today 18th June 2024 price of gold and silver fall in maharashtra check latest rates

Gold Price Today: जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज मंगळवारी सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज मंगळवारीदेखील सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात जरी घट झाली असली तरी चांदीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 320 रुपयांची वाढ झाली असून 89.140 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड होत आहे. मागील सत्रात चांदी 88,820 रुपयांवर स्थिरावली होती. 

मौल्यवान धातूच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरता आली होती. डॉलरमध्ये चढ-उतार कमी झाल्याने आणि युएस बॉन्ड यील्डचे दर घसरल्यानेही सोन्याच्या दरात घट झाली होती. यूएस स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून $2,323 प्रति औंसवर होते, तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी वाढून $2,339 वर होते. स्पॉट चांदीचा भाव सुमारे $29.49 प्रति औंस होता.

गुड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली होती. त्यामुळं आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,300 रुपये इतकी होती. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 72,220 रुपये इतका होता. 18 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 54,160 रुपये इतका आहे. 

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट   66,200 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72,220 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54,160 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6,620 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,222 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,416  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   52, 960 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57,776 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,416  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  66,200 रुपये
24 कॅरेट-  72,220 रुपये
18 कॅरेट-  54,160 रुपये