Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. 

Updated: Nov 22, 2021, 03:15 PM IST
Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ; जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई : सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच लग्नसराईमध्ये सोन्याला मागणी असते. त्या दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असतो. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून आली. सोन्याच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे दर 48838 रुपये प्रति तोळे इतके आहेत. तर चांदीचे दर 65976.00 प्रति किलोवर ट्रेड करीत आहे.

राज्यात लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढली असून, सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. मुंबई, पुणे, जळगाव अशा सोन्याच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर 49,280 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे दर 65,600 प्रति किलो इतके आहे. 

सोन्याचे दर 
मुंबई 49,280 प्रति तोळे
पुणे 50,470 प्रति तोळे
नागपूर 49,280 प्रति तोळे
नवी दिल्ली 52,240 प्रति तोळे

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊन 56 हजार प्रतितोळेंवर पोहचले होते.  आज सोने 47 हजार 500 च्या आसपास ट्रेड करीत आहे.

त्यामुळे रेकॉर्ड हाय पेक्षा सोने स्वस्तच मिळत असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून येत आहे. 

-

(वर दिलेले सोन्याचे दर कोणतेही कर वगळून देण्यात आले आहेत. स्थानिक बाजारपेठांनुसार यात बदल होऊ शकतो)