मुंबई : Gold Silver Price Today : सोन्या चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. गेल्या 5 दिवसांपासून सोनं जवळपास 450 रुपयांनी स्वस्त झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर 0.26 टक्क्यांपर्यंत घसरलं आहे.
सोमवारी सोन्याचा दर 0.16 टक्क्यांनी घसरलं असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 47926 रुपये आहे. MCX वर सोन्याच्या दरात पूर्ण आठवड्यात संथपणे पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर घसरून 47500 रुपयांपर्यंत खाली जाऊन स्थिरावला आहे. जवळपास 400 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. यासोबतच चांदीच्या दरही स्थिरावलाय.
सोमवारी सोन्याचा दर 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. या सोन्याच्या दरात 0.26 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे. त्यानुसार आता 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 47480 रुपये आहे.
सोमवारी चांदीच्या दरात 0.30 टक्के घसरण पाहायला मिळत आहे. हा दर 67865 प्रति किलोग्रॅम होता. आता तो 66720 रुपयांवर घसरला आहे. 5 दिवसांत 1100 रुपयांहून अधिक दराने स्वस्त झालं आहे.
सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होऊ शकते असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी आहे. सोन्याच्या दरात 3 ते 5 दिवसांत वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.