सोने, चांदी दरात पुन्हा घसरण, पाहा दर

सोने किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु आज चांगली बातमी म्हणजे सोने आणि चांदी यांची किंमत पुन्हा एकदा खाली आली आहे.  

Updated: Sep 22, 2020, 05:57 PM IST
सोने, चांदी दरात पुन्हा घसरण, पाहा दर

मुंबई / जळगाव : सोने किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु आज चांगली बातमी म्हणजे सोने आणि चांदी यांची किंमत पुन्हा एकदा खाली आली आहे. आज मंगळवारी बाजार उघडताच सोने किंमत (gold price today) खाली आली. मागणीत घट झाल्याने सोने स्वस्त झाले आहे. सोने दर १००० रुपयांनी घसरला. तर चांदीचा दर किलोमागे पाच हजार रुपयांनी खाली आला. सोने १० ग्रॅमला ५१,००० रुपये तर चांदीचा भावही घसरुन तो ६०,००० रुपये प्रति किलो झाला. 

आज सोने-चांदीच्या भावात कमालीची घसरण पाहायला मिळाली. सोने प्रतितोळे एक हजार रुपयांनी उतरले तर चांदी पाच हजार प्रतिकिलोने कमी झाली आहे. सोने प्रतितोळे ५२,००० वरून ५१,००० प्रतितोळे झाले आहे. तर चांदी ६५ हजार प्रतिकिलो वरून ६० हजार प्रतिकिलो झाली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याची मागणी घटल्यामुळे सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

सराफा बाजारात आज पुन्हा एकदा नफा वसुलीचा दबाव दिसून आला आहे. कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५२ हजार रुपये असून त्यात १००० रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६५ हजार रुपये असून त्यात ५००० हजार रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये भ्रष्टाचार समोर येत असून गुंतवणूक होत नसल्याने सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे, असे काही सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

मागील तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. ग्राहकांना सध्या सुरू असलेल्या अधिक मास आणि दिवाळीचे वेध लागले आहेत. या महिन्यात सोने खरेदी करणे शुभ असल्याने सध्या सोने बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून आली आहे. आज सोने स्वस्त झाले असून अधिक महिना असल्याने सोने खरेदी करणे चांगले असते, म्हणून आज सोने खरेदी करायला आलो, असे काही ग्राहकांनी सांगितले.