नवी दिल्ली : जर तुमच्याकडे जनधन अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार पुन्हा एकदा लोकांसाठी 1 फेब्रुवारीला मोठी घोषणा करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार बजेटमधये पंतप्रधान जन धन योजनेची सीमा वाढवणार आहे.
सरकार यंदा बजेटमध्ये ओवरड्राफ्ट अमाउंटमध्ये वाढ करु शकते. आता या स्कीममध्ये 6 महिन्यांपर्यंत खात्यामध्ये आवश्यकतेनुसार ऑपरेशननंतर 5000 रुपयांपर्यंतच्या ओवरड्राफ्टची व्यवस्था आहे. ही सुविधा प्रत्येक कुटुंबाच्या फक्त एका व्यक्तीला मिळते. जी एका खात्यासाठी असते. ज्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं जातं. आता ही रक्कम वाढवून 10000 रुपये करण्यात येणार आहे. ज्यामुळे आपातकालीन स्थितीत याचा फायदा होईल.
सरकार याला प्रोत्साहन देण्यासाठी विचार करत आहे. ते बँका आणि इतर आर्थिक संस्थानांना चांगले ऑपरेटीव्ह खाते ठेवणाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मदत करतील. पीएमजेडीवायनुसार जवळपास 31 कोटी याचे लाभार्थी आहेत. पीएमजेडीवायटी वेबसाईट नुसार 17 जानेवारीपर्यंत या खात्यांमध्ये जवळपास 73689.72 कोटी रुपये आहेत. यामध्ये जवळपास 24 कोटी लोकांची खाती आहेत.
आता पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजनानुसार 5.3 कोटी लोकं इंश्योर्ड आहेत. यामध्ये 330 रुपये प्रतीवर्षाला भरावे लागतात. ज्यामध्ये 2 लाख रुपये एक वर्षासाठी रिन्यूएबल टर्म लाइफ कव्हर होतं. जवळपास 13 कोटी लोकं याचा लाभ घेत आहेत.