नवी दिल्ली : दोन दिवस आधी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प सर्वेक्षणात भारताचा विकास दर 6.75 वरुन 2018-19 मध्ये 7 से 7.5 टक्के राहिल असं सांगण्यात आलं आहे.
आर्थिक सर्वेक्षणानुसार 2017 मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जेथे काही प्रमाणात पडझड पाहायला मिळत आहे. तर येणारी वेळ पुन्हा एकदा भारताच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत गती आणेल असं दिसतंय. ज्यामुळे पंतप्रधान मोदींचे अच्छे दिन येणार आहेत.
आजच्या इकोनॉमिक टाइम्सच्या बातमीमध्ये संपादकीयमध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्री स्वामीनाथन एस. अंकलेश्वर अय्यर यांनी हे विश्लेषण केलं आहे की, पंतप्रधान मोदी हे नशीबवान आहेत. नशीब पुन्हा एकदा त्यांच्या सोबत आहे.
2014 मध्ये सत्तेत आले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था डगमगत होती आणि होणारा खर्च देखील जास्त होता. पण अशा वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्यी किंमती 120 डॉलर प्रति बॅरलवरुन घटून 40 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचलं होतं. यामुळे जेथे एकीकडे जीडीपी दरमध्ये सुधार दिसत होता तर दुसरीकडे देशाच्या तिजोरीवरचा ताण देखील कमी झाला होता. मोदींनी भाजप सत्तेत आल्याचा हा परिणाम असल्याचं म्हटलं होतं.
इकोनॉमिक सर्वेच्या आधारावर मोदींच्या व्यक्तिगत यशाची चर्चा करतांना अय्यर यांनी म्हटलं की, काळापैसा आणि भ्रष्टाचारच्या विरोधात लढण्याच्या बाबतीत त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये सुधार आला आहे. कारण जीएसटीनंतर अप्रत्यक्ष रूपात टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 50 टक्के वाढली आहे. येणाऱ्या काळात जीएसटीचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतील. अशातच निवडणुकीच्या वर्षात प्रवेश करणे हे पीएम मोदींसाठी पुन्हा एकदा जमेची बाजू असेल.
अय्यर यांनी पीएम मोदी यांच्या काही अपयशाचं देखील अधोरेखीत केलं आहे. देशातील लाखो तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरलं. शेतकऱ्यांचा फायदा वाढवण्यात देखील सरकार अपयशी ठरलं. 'मेक इन इंडिया' कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी नाही झाला. काही चांगल्या गोष्टी असल्या तरी मोदींना निवडणुकीत थोड्या अडचणींचा सामना करावा लागेल.
जगाती स्थिती पुन्हा एकदा बदलत आहे. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढणार आहेत. ही फक्त वैश्विक अर्थव्यवस्थेलाचा प्रभावित करेल असं नाही. पण यामुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढणार आहेत. पुन्हा एकदा 2003-08 सारखी परिस्थिती येऊ शकते. जे निवडणुकीच्या वर्षात देशाच्या राजकारणावर देखील परिणाम करेल. याचे परिणाम भारतात निवडणुकीच्या नंतर दिसतील याचे निवडणुकीच्या काळात काही परिणाम जाणावर नाहीत.