मुंबई : भारत रत्न शहनाई वादक उत्साद बिस्मिल्लाह खाँ यांचा बुधवारी 21 मार्च रोजी 102 वा जन्मदिन आहे.
उत्साद बिस्मिल्लाह खांँ यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी झाला होता. त्यांच्या जन्मदिनी गुगलने डूडल करून सन्मान केला आहे. बिस्मिल्लाह खाँ यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. शहनाई वादनात त्यांना भारताला जगभरात एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.
वाराणसीच्या दालमंडी येथे उत्साद बिस्मिल्लाह खाँ यांच घर आहे. तिथे त्यांचं संपूर्ण कुटूंब राहत. भारत रत्नाबरोबरच खां साहेबांना पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, तानसेन अवॉर्डने सन्मान केला आहे. उत्साद बिस्मिल्लाह खां यांना 2001 मध्ये भारत रत्न, 1980 पद्मविभूषण, 1968 पद्मभूषण आणि 1961 पद्मश्री सन्मान केला आहे. 90 व्या वर्षी 21 ऑगस्ट 2006 रोजी त्यांच निधन झालं.