Google On Data Theft : गुगल सर्च करताय सावधान! गुगल मदत नाही चोरी करणार?

कस्टमर केअर (customer care) नंबर तुम्ही गुगलवर शोधता? तर मग तुमची ऑनलाईन फसवणूक (online fraud) होऊ शकते. 

Updated: Jan 12, 2023, 11:03 PM IST
Google On Data Theft : गुगल सर्च करताय सावधान! गुगल मदत नाही चोरी करणार? title=

Google On Data Theft : तुम्हीही छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यासाठी गुगलचा (Google) वापर करता? कस्टमर केअर (customer care) नंबर तुम्ही गुगलवर शोधता? तर मग तुमची ऑनलाईन फसवणूक (online fraud) होऊ शकते. तुमचा बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतो. गुगलवरुन मिळालेला नंबर तुमचं अकाऊंट कसं रिकामी करु शकतो पाहुयात.

नोएडात राहणारे सभाजीत यादव.. सभाजीत महिन्याला 25 हजार रुपये कमवतात पण त्यांची महिन्याभराची सारी कमाई सायबर फ्रॉडमध्ये वाहून गेली. याला कारण ठरला गुगल बाबा.. डेबिट कार्डाची (Debit card) पीन जनरेट कशी करतात यासाठी त्यांनी आपल्या बँकेचा कस्टमर केअर नंबर गुगलवरुन शोधला.. पण त्यांना गुगलने जो पहिला कस्टमर केअर नंबर दाखवला तो बँकेचा नव्हताच. तो चक्क बँक फ्रॉड करणा-या हॅकरचा होता, ज्यानं तब्बल 45 हजार रुपयांना सभाजित यांना गंडा घातला

सभाजितसारखी देशात असंख्य लोकं आहेत जी गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधतात. पण त्यांना कस्टमर केअरऐवजी सायबर गुन्हेगाराचा नंबर मिळतो.. 

गुगलद्वारे कशी होते लूट? 

  • हॅकर्स गुगल जाहिरातींचा वापर करतात
  • सायबर गुन्हेगार कस्टमर केअरची नकली वेबसाईट तयार करतात
  • ही वेबसाईट पैसे देऊन बूस्ट करतात
  • त्यामुळे जेव्हा तुम्ही कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च करता तेव्हा तुम्हाला कस्टमर केअर किंवा सर्व्हिस प्रोव्हाईडरचा नंबर मिळत नाही
  • तर थेट सायबर हॅकरच्या नकली वेबसाईटवर तुम्ही डायरेक्ट केले जाता
  • बँक कस्टमर केअर समजून सायबर हॅकरलाच तुम्ही फोन लावता
  • बँक अकाऊंटची माहिती हॅकरला देता आणि तो क्षणात तुमचा अकाऊंट खाली करतो
  • भ्रम निर्माण करणा-या या वेबसाईट्सना फिशींग वेबसाईट्स म्हणतात

छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली जाते. गुगलवर दिसणारी पहिली वेबसाईट ही अधिकृत असते असा आपला समज असतो. याच गैरसमजाचा फायदा हॅकर्स घेतात आणि लूट करतात. त्यामुळे तुम्हीही गुगलवर सर्च करत असाल तर सावधान.