Bank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान

Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण.... 

Updated: Jan 10, 2023, 02:20 PM IST
Bank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान  title=
Government decides to privatise SBI PNB fact check

Bank Privatisation Fact Check: (New Year 2023) नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या वृत्तानुसार ( IDBI Bank) आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. परिणामी या बँकांच्या खातेधारकांची नजर याच बातमीकडे वळली आहे. बँक खासगी झाल्याचा आमच्या खात्यावर काय परिणाम होणार? आमची Saving तर सुरक्षित असेल ना? असे अनेक प्रश्न खातेधारकांनी विचारले. त्यामागोमागच आणखी काही मोठ्या बँकासुद्धा लवकरच खासगी केल्या जाणार असल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) , पीएनबी (PNB) आणि एसबीआय  (SBI) यांचा समावेश आहे. 

(Savings) देशभरात सुरक्षित ठेवी, म्हणून हमी असल्यामुळं एसबीआयमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची (Investment in SBI) आणि ठेवी असणाऱ्यांची मोठी संख्या. त्यामुळं आता हीच बँक खासगी झाल्यास त्याचे परिणाम काय असतील या विचारानं अनेकांना घाम फुटला. ही सर्व परिस्थिती आणि विषयाचं गांभीर्य पाहता आता सरकारकडूनच याविषयीचा नेमका प्लान अर्थात यामागचं सत्य समोर आणण्यात आलं आहे. 

...आणि नेमकं सत्य समोर आलं

PIB Fact Check कडून याविषयीचं सत्य समोर आणलं गेलं. जिथं एसबीआय (SBI) आणि पीएनबी (PNB), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या बँकांच्या खासगीकरणाच्या चर्चा उधळून लावण्यात आल्या. काही माध्यमांमध्ये सदरील बँकांच्या खासगीकरणाविषयीची वृत्त प्रसिद्ध केली जात असून, ती खोटी असल्याचं सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आलं. नीति आयोगाकडून याबाबत कोणतीही यादी जाहीर करण्यात आली नसल्याचंही यावेळी सांगितलं गेलं. 

जुन्या चर्चांना पुन्हा नवं रुप.... 

एकाएकी या महत्त्वाच्या बँका खासगी होणार असल्याच्या चर्चा समोर आल्या कारण, 2019 मध्ये सरकारकडून अनेक बँकांचं विलनीकरण करण्यात आलं होतं. ज्यानंतर देशातील केंद्राच्या अख्त्यारीत येणाऱ्या बँकांचा आकडा 12 वर पोहोचला होता. 

हेसुद्धा वाचा : Swiss Bank : 116 वर्षांच्या इतिहासात स्विस बँकेला मोठा आर्थिक फटका, 143 अब्ज डॉलरचे नुकसान

दरम्यान, सध्याच्या घडीला बँक खासगीकरणाविषयी काही अफवांना वाव मिळत आहे. किंबहुना त्यासंबंधीचे अनेक मेसेजही फॉरवर्ड केले जात आहेत. पण, अशा मेसेजेसना बळी न पडण्याचं आवाहन केंद्र शासनाकडून केलं जात आहे. हे असे कोणतेही मेसेज सरकारनं जारी केले नसून, तुम्हाला असा एखादा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी तो मेसेज रिपोर्ट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.