सरकारने वाढवली भीम अॅपवर कॅशबॅक सुविधेची मर्यादा !

सरकारने भीम अॅपवर असणारी कॅशबॅक सुविधा पुढील वर्ष मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेत भीम अॅपद्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 21, 2017, 08:59 AM IST
सरकारने वाढवली भीम अॅपवर कॅशबॅक सुविधेची मर्यादा ! title=

नवी दिल्ली : सरकारने भीम अॅपवर असणारी कॅशबॅक सुविधा पुढील वर्ष मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेत भीम अॅपद्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.

इलेकट्रोनिक्स आणि औद्योगिक मंत्रालयातून सादर करण्यात आलेल्या अहवालात ही योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत चालू राहणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस पेमेंट ला प्रोत्साहन देण्यासाठी १४ एप्रिलला ६ महिन्यांसाठी ही योजना सुरु केली होती. 

अगोदर या योजनेतून दुकानदारांना २० ते ५० रुपयांच्या वसुलीवर ५० रुपये कॅशबॅक मिळत होते. त्यानंतर ९५० रुपयांच्या प्रत्येक देवाणघेवाणीवर २ रुपये कॅशबॅक मिळत होते. भीम कॅशबॅक योजनेची मासिक मर्यादा १००० रुपये इतकी आहे. या योजनेची एक अट आहे. ती अशी की दुकानदाराने कमीत कमी २० वेळा व्यवहार भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम अॅपद्वारे करावे आणि प्रत्येक व्यवहार कमीत कमी २५ रुपयांचा असायला हवा.