मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या सणांसाठी आरोग्य विभागाने काही नियम जाहीर केले आहेत. सण साजरे करताना यावेळी काय काळजी घ्यायची आहे. याबाबत सरकारने काही गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. याबाबत सरकारने नागरिकांना सहकार्य करण्याची आणि नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याच प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी नसणारे. 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेले व्यक्ती, गरोदर महिला आणि लहान मुलांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नवरात्री दरम्यान मूर्ती विसर्जन करण्यासाठी काही ठिकाणं ठरवून दिल्या जातील. या दरम्यान कमी लोकांना परवानगी दिली जाईल. एकत्र येण्यासाठी कोणतीच परवानगी दिली जाणार नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या सूचनेनुसार कंटेनमेंट झोनमध्ये कोणतेच कार्यक्रम, सण, धार्मिक पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असणार आहे. धार्मिक स्थळावर आणि नवरात्र काळात मूर्तीला हात लावता येणार नाही. जेणेकरून संसर्ग होणार नाही. मंडपाच्या ठिकाणी स्वच्छता, थर्मल स्क्रीनिंग, सेनेटाइजेशन असणं आवश्यक राहणार आहे.
1- मंडपाच्या ठिकाणी कोविड 19 संबधित सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. थर्मल स्क्रीनिंग, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनेटाइजेशन अनिवार्य असणार आहे.
2- रॅली आणि विसर्जन यात्रा काढता येणार नाही. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विसर्जन करावे लागेल.
3- विसर्जन स्थळ जर लांब असेल तर अशा विसर्जन यात्रे दरम्यान अँबुलेंस सेवा दिली जाईल.
4- काही दिवस चालणारे कार्यक्रम जसे की, जत्रास पूजेचा मंडप, रामलीला अशा ठिकाणी लोकांच्या संख्येनुसार व्यवस्था हवी.
7- वालेंटियर्स थर्मल स्क्रीनिंग, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनेटाइजेशनचं काम करतील.
8- थियेटर आणि सिनेमा कलाकार यांच्यासाठी देखील या गाईडलाईन्स असणार आहेत.
9- सॅनिटाइजर आणि थर्मल गनसह फिजिकल डिस्टेंसिंगसाठी जमिनीवर मार्किंग करणं आवश्यक आहे.
10- फिजिकल डिस्टेंसिंग आणि मास्क वापरण्यासाठी लोकांना सांगावे लागेल.