मुंबई : 'पीएफ'धारकांसाठी (PF Holder) महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) पीएफ खात्याबाबतच्या (PF Account) नियमांमध्ये काही बदल केले आहेत. कोरोना काळात पीएफ खात्यातू रक्कम काढण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात अटी आणि नियम शिथिल केले. जेणेकरुन पीएफधारकाला कठीण काळात पैशांचा उपयोग होऊ शकेल. अशातच सरकारकडून काही नियमही करण्यात आले आहेत. या नियमांमुळे पीएफधारकांना पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी सोपं ठरणार आहे. अशातच नक्की कोणते नियम बदलले आहेत ते जाणून घ्या. (Government has changed these rules regarding PF accounts, know new updates)
कोव्हिड अॅडव्हान्स
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या पीएफधारकांना कोव्हिड अॅडव्हान्स घेतला होता, ते या दुसऱ्या लाटेत पुन्हा अॅडव्हान्स रक्कमेचा लाभ घेऊ शकतात. पीएफधारकाला आपल्या खात्यातून 75 टक्के रक्कम काढता येऊ शकते. तसेच काढण्यात येणारी रक्कम ही 3 महिन्यांचा पगार आणि डीएपेक्षा कमी असायला हवी.
नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स
जे पीएफधारक गेल्या महिन्यापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून बेरोजगार आहेत, ते खात्यातून रक्कम काढू शकतात. एकूण रक्कमेच्या 75 टक्के रक्कम काढता येईल. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत पीएफ खातं बंद केलं जाणार नाही.
नोकरी गमावल्यानंतरही अॅडव्हान्स
कोरोना काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अशात जे जे बरोजगार झालेत, त्यांनाही कोव्हिड अॅडव्हान्स रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
आधार लिंक करणं बंधनकारक
सरकारने आता पीएफ खातं आधारसह लिंक करण्यास सांगितलं आहे. खातं आधारसह लिंक न केल्यास कंपनीकडून रक्कम खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे पीएफधारकांनी लवकरात लवकर खातं आधारसह जोडून घ्यावं.
अधिक वाचा :
'या' बँकांमध्ये अकाऊंट असल्यास पीएफची रक्कम काढता येणार नाही
PF Account | पीएफ खात्यातील पेन्शनची रक्कम कशी काढायची? जाणून घ्या प्रक्रिया
PF Withdrawal | पीएफची रक्कम किती दिवसांनंतर खात्यात जमा होते?
EPFमधील हे 5 मोठे बदल तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या याचे फायदे