15 ते 18 वयोगटातील लसीकरण आणि बुस्टर डोससाठी काय आहेत सरकारचे नियम, जाणून घ्या

कोरोनाचा नवा व्हेरिएंट जगभरात धुमाकूळ घालत असताना सरकारने देखील आता खबरदारीचा उपाय म्हणून बुस्टर डोसला मान्यता दिलीये.

Updated: Dec 27, 2021, 07:49 PM IST
15 ते 18 वयोगटातील लसीकरण आणि बुस्टर डोससाठी काय आहेत सरकारचे नियम, जाणून घ्या title=

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असताना पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन लसीकरण कार्यक्रमांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी खबरदारीचा डोस आणि 60 वर्षांवरील लोकसंख्येसाठी जारी करण्यात आली आहेत.

सरकारच्या माहितीनुसार, ज्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना 10 जानेवारीपासून कोरोनाचा आणखी एक डोस दिला जाईल. याला बुस्टर डोस म्हटले जाईल. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दुसऱ्या डोसचे 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच हा डोस दिला जाईल.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 3 जानेवारी 2022 पासून 15-18 वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू केले जाईल. या सर्वांना भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचा डोस दिला जाईल.

आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्स ज्यांना आधीच लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत त्यांना 10 जानेवारी 2022 पासून कोरोना लसीचा आणखी एक डोस दिला जाईल.

- 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्ती ज्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यावरच त्यांना सावधगिरीचा डोस दिला जाईल. हे लसीकरण देखील 10 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे.

- मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जेव्हा पात्र लाभार्थ्यांच्या प्री-कलेक्शन डोसची वेळ आली आहे, तेव्हा त्यांना याची आठवण करून देण्यासाठी COWIN प्रणालीद्वारे एसएमएस पाठविला जाईल.

- लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा थेट लसीकरण केंद्राला भेट देऊन नोंदणी आणि भेटीची वेळ बुक केली जाऊ शकते.

- ज्यांना कोरोनाचा सावधगिरीचा डोस दिला जाईल, त्यांची संपूर्ण माहिती कोरोना व्हायरस लसीकरण प्रमाणपत्रात दिली जाईल.

सरकारने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात असेही नमूद केले आहे की, सर्व नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाची स्थिती विचारात न घेता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण करण्याचा अधिकार आहे. ज्यांना पैसे देणे परवडते त्यांना खाजगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुलांसाठी लसीकरण आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी खबरदारीचे डोस जाहीर केले.