PM Kisan:१ डिसेंबरला मिळेल २ हजारांचा हफ्ता, यादीत तुमचं नाव आजचं तपासा

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi ) योजनेचा ७ वा हफ्ता १ डिसेंबरपासून मिळणार

Updated: Nov 27, 2020, 08:12 AM IST
PM Kisan:१ डिसेंबरला मिळेल २ हजारांचा हफ्ता, यादीत तुमचं नाव आजचं तपासा

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi ) योजनेचा ७ वा हफ्ता १ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा होणार आहे. तुम्ही देखील शेतकरी आहात आणि या हफ्त्याची वाट पाहत असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

२ हजारांचा हफ्ता 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये देते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ६ हफ्ते दिले गेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पहीला हफ्ता डिसेंबर २०१८ मध्ये दिला गेला होता. 

यावेळी ३.१५ कोटी ९९ हजार ६२९ शेतकऱ्यांना निधी देण्यात आला. ७ वा हफ्ता १ डिसेंबरला दिला जाईल. गेल्या २३ महिन्यामध्ये केंद्र सरकारने ११.१७ कोटी शेतकऱ्यांना थेट ९५ कोटी रुपयांहून अधिक मदत मिळाली आहे. 

तुमचे नाव या यादीत नसेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. कित्येक वेळा रजिस्ट्रेशन करुनही सरकारी मदत येत नाही. त्यामुळे तुमचे नाव या यादीत आहे ता आहे आजच तपासून पाहा. जर यादीत नाव नसेल तर हफ्ता मिळणार नाही हे लक्षात असू द्या. 

मागचा हफ्त्यातील पैसे मिळाले नसलेल्यांना चुका सुधारण्याची संधी आहे. यासाठी पंतप्रधान शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. शेतकरी घरबसल्या अर्ज करुन पेपर्स ऑनलाईन अपलोड करु शकतात. ही प्रक्रीया खूप सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे. 

१) पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची वेबसाईट pmkisan.gov.in वर जा

२) वेबसाईटच्या उजवीकडे खालच्या बाजूस Farmers Corner असे दिसेल. त्यावर क्लिक करा. 

३) इथे अनेक पर्याय दिसतील. 

४) इथे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करु शकता.

५) आधारवरील नावाची स्पेलिंग, अकाऊंट नंबरमधील चुका सुधारायच्या असल्यास हेल्पडेस्कवर क्लिक करा. 

६) इथल्या अर्जावर क्लिक करु तुम्ही चुका सुधारु शकता. 

७) कोणाला आणखी मदत हवी असल्यास हेल्पलाईन - ०११-२४३००६०६ वर फोन करु शकता.