LIC आणि IDBI मधील काही भाग विकणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात आणखी एक मोठी घोषणा

Updated: Feb 1, 2020, 01:49 PM IST
LIC आणि IDBI मधील काही भाग विकणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात आणखी एक मोठी घोषणा केली आहे. एलआयसीमधील काही भाग विकणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. सरकार LIC मधील आपला काही भाग विकणार आहे या घोषणेनंतर विरोधकांनी गोंधळ केला. अर्थमंत्र्यांनी म्हटलं की, 15व्या वित्त आयोगने रिपोर्ट दिला आहे. सरकारने तो स्विकार केली आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटलं की, 2020-21 साठी जीडीपी 10 टक्के राहण्याची शक्यता आहे. य़ा आर्थिक वर्षात २६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२० च्या बजेटमध्ये आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे सरकार भारतीय जीवन बीमा निगममध्ये आयपीओ आणणार आहे. य़ाशिवाय IDBI चा देखील काही भाग सरकार विकणार आहे. IDBI बँकेतील काही भाग स्टॉक एक्सचेंजमध्ये विकला जाणार आहे. 

या सोबतच बँकांमधील ५ लाखापर्यंतीची रक्कम सुरक्षित राहणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. आधी ही मर्यादा एक लाखापर्यंत होती.