Business Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं

Great Business Ideas : भूक ही माणसाची प्राथमिकता असल्याने या धंद्यात पैश्याने पैसा खेचला जाऊ शकतो. त्यामुळे, रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (Food stall rent at railway station) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो.

Updated: Oct 16, 2023, 11:02 PM IST
Business Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं title=
Business Ideas Part 1 | food stall at railway station

Food stall rent at railway station : देशात दररोज 2.5 कोटींहून अधिक लोक रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. मुंबई सारख्या शहरात अर्धी लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. तर इतर प्रमुख शहरात देखील रेल्वे प्रवासाच्या संख्येत मोठी वाढ झालीये. तिथं लोक तिथं बिझनेस (Great Business Ideas) ही संकल्पना चालत आलीये. त्यामुळे तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (food stall) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो. भारतीय रेल्वे देशातील अप्रत्यक्षपणे 14 लाख लोकांना थेट रोजगार देते, त्यामुळे तुम्ही देखील याचा फायदा घेऊ शकता, कसं ते पाहा...

रेल्वे प्लॅटफॉर्म (Food stall rent at railway station) आणि ट्रेन्सवर खाद्यपदार्थांच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू शकतं. अनेक दुकानदार आणि नवीन तरुण उद्योजक रेल्वे मार्ग व्यवसाय करण्याचा विचार करतात.  रेल्वे स्थानकावर कॅटरिंग टेंडर उघडणे आणि फूड स्टॉल लावण्यासाठी भारतीय रेल्वे निविदा काढते, त्यासाठी अर्ज करून दुकान सुरू करण्याचा परवाना मिळू शकतो.  साधारणपणे, बुक स्टॉल, चहा-कॉफी स्टॉल आणि फूड स्टॉल उघडण्यासाठी अंदाजे 40 हजार ते 3 लाख रुपये खर्च येतो. कोणतं रेल्वे स्थानक आहे, त्यानुसार याची किंमत ठरलेली असते. अन्न संबंधित सुविधांसाठी तुम्हाला IRCTC कडे अर्ज करावा लागतो.

रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ किंवा इतर कोणताही स्टॉल उघडण्यासाठी दुकानदाराकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इत्यादी असणं आवश्यक आहे. संबंधित रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या उपलब्धतेसाठी, IRCTC आणि भारतीय रेल्वेच्या साइटवरील निविदा विभागाला भेट देऊन माहिती मिळवा. निविदेत भाडे आणि इतर अटींची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा - Health Tips : नाश्ता करताना 'या' 4 चुका करूच नका; निरोगी आयुष्य गमावून बसाल!

दरम्यान, भारतात व्यवसाय करणं आता सोपी गोष्ट झाली आहे. सध्या अधिक तरुण व्यवसायाचा मार्ग निवडत आहेत. खाद्यपदार्थांच्या व्यवसाय कधी तोट्यात जात नाही, असं म्हणतात. भूक ही माणसाची प्राथमिकता असल्याने या धंद्यात पैश्याने पैसा खेचला जाऊ शकतो. मात्र, व्यवसाय सुरू झाल्यानंतर टिकून ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे.