मुंबई : PMC Bank News :सहकारी बँक पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (PMC Bank) या बँकेचे लवकरच दिल्लीच्या बँकेत विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे हजारो ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ठेवीदारांना 10 वर्षांत पूर्ण पैसे मिळणार आहेत. याबाबत RBI कडून ग्राहकांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. (Great relief to PMC Bank depositors, RBI issues notification to customers)
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत हजारो ठेवीदारांचे अडकलेले पैसे आता मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने नवी दिल्लीस्थित युनिटी स्मॉल फायनान्स बँकेद्वारे घोटाळेग्रस्त पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या संपादनाला सुकर करण्यासाठी मसुदा आराखडा प्रसिद्ध केला आहे. या मसुदा योजनेबाबत सूचना आणि हरकती 10 डिसेंबरपर्यंत मागितले आहेत. त्यानंतर विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) युनिटी स्मॉल फायनान्स बँकमध्ये (USFB) विलीनीकरणास मान्यता दिली आहे. PMC बँकेच्या ग्राहकांना 3 ते 10 वर्षात जमा केलेली रक्कम मिळेल. PMC बँक दिल्लीतील युनिटी स्मॉल फायनान्स बँकमध्ये (USFB) विलीन केली जाईल. युनिटी बँक भारत पे आणि सेंट्रम यांनी संयुक्तपणे सुरु केली आहे. सोमवारी, रिझर्व्ह बँकेने सांगितले की, या डील अंतर्गत, USFB PMC बँकेच्या मालमत्ता आणि दायित्वांसह सर्व ठेवी देखील घेईल.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मसुद्यानुसार, पीएमसी बँकेतील ग्राहकांच्या ठेवी 3 ते 10 वर्षांत परत केल्या जातील. तथापि, USFB प्रथम ठेव विमा अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतची हमी रक्कम प्रदान करेल. जर एखाद्याची रक्कम यापेक्षा जास्त जमा असेल तर तो 3 वर्षांत 50 हजार रुपये आणि पुढील 4 वर्षांत एक लाख रुपये देईल. यानंतर 3 लाख रुपये 5 वर्षात तर 5.5 लाख रुपये दहा वर्षात दिले जातील. बँकेच्या 84 टक्के ग्राहकांना त्यांच्या ठेवी मिळाल्या आहेत.