भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.

Updated: Jun 29, 2021, 08:01 AM IST
भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरच्या मलूरा पारिंपोरा भागात सोमवारी एनकाउंटर दरम्यान लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा केला. जवानांनी टॉप कमांडर नदीम अबरारसह दोन दहशतवाद्यांना देखील ठार केलं आहे. श्रीनगर बारामुल्ला सीमेवर अनेक हत्या आणि दहशतवादी कारवायांमध्ये अबरारचा सहभाग असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हायवेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल सैन्य दलाला माहिती मिळाली. तेव्हा सतर्कता दाखवत हायवेवर पोलीस आणि सीआरपीएमने संयुक्त तपासणी केली गेली. 

परिमपोरा नाका येथे एक गाडी थांबविण्यात आला आणि त्यांची ओळख विचारण्यात आली. या दरम्यान मागील सीटवर मास्क लावलेल्या व्यक्तीने आपली बॅग उघडण्याचा प्रयत्न केला आणि ग्रेनेड बाहेर काढला. पोलिसांच्या लक्षात येताचं तैनात असेलेल्या टीमने मागे बसलेल्या व्यक्तीला पकडलं. ड्रायव्हरच्या मागील सीटवर 2 व्यक्ती होत्या.

सतर्कता दाखवत जवानांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्थानकात आणलं. त्यांच्या मास्क काढल्यानंतर  माहिती झालं की  तो व्यक्ती लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरार आहे. त्याला जेकेपी आणि सीआरपीएफच्या जवानांनी चौकशीसाठी ठेवलं होतं. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले. जेकेपी आणि सीआरपीएफच्या संयूक्त पथकांनी वारंवार चौकशी केली असता, समोर आलं की दहशतवाद्यांनी एके-रायफल मलुरा येथील एका घरात ठेवली होती.