लग्नाच्या वरातीत आधी बँड-बाजा वाजला आणि नंतर नवरदेवाचाही बँण्ड वाजला, व्हिडीओ

लग्नाच्या वरातीमध्ये तुम्ही अशी चूक करू नका नाहीतर तुम्हालाही हे महागात पडू शकतं. 

Updated: Jun 19, 2021, 02:37 PM IST
लग्नाच्या वरातीत आधी बँड-बाजा वाजला आणि नंतर नवरदेवाचाही बँण्ड वाजला, व्हिडीओ title=

मुंबई: लग्नाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. लग्न समारंभामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कॅमेऱ्या कैद होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता आधी बँड बाजा वाजतो त्यावर वराती नाचतात आणि नवदेवाचा बँड कसा वाजतो हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. 

लग्नाच्या वरातीमध्ये तुम्ही अशी चूक करू नका नाहीतर तुम्हालाही हे महागात पडू शकतं. आजकाल लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. नुकताच सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मित्र आणि नातेवाईक वरातीत नाचत आहेत. प्रत्येकजण खूप मजेच्या मूडमध्ये दिसत आहे. 

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की नवरदेवाला मित्राने खांद्यावर घेतले. हा मित्र नवरदेवाला घेऊन नाचत आहे. त्याचवेळी नवरदेवाचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक खूप हसत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 12 हजार लोकांनी पाहिला आहे.