वायू प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पेट्रोलला या इंधनाचा पर्याय; नितीन गडकरी यांची आयडीया

 केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी आज सीआरपीएफ कॅम्पला भेट दिली. एक मुलाकात जवानो के साथ या कार्यक्रमाअंतर्गत गडकरी सीआरपीएफ जवानांना संबोधित केले.

Updated: Jun 19, 2021, 01:52 PM IST
वायू प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पेट्रोलला या इंधनाचा पर्याय; नितीन गडकरी यांची आयडीया title=

नागपूर : केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी आज सीआरपीएफ कॅम्पला भेट दिली. एक मुलाकात जवानो के साथ या कार्यक्रमाअंतर्गत गडकरी सीआरपीएफ जवानांना संबोधित केले.

गडकरी यांनी जवानांना संबोधित करताना महत्वाच्या प्रश्नांचा उलगडा केला. आपल्याला नागपूरला जल, वायू आणि ध्वनी प्रदुषण मुक्त करायचे आहे. वायू प्रदुषण रोखण्यासाठी येत्या काळात पेट्रोलच्या गाड्यांमध्ये इथेनॉलचा वापर वाढणार आहे. येत्या काळात Flex इंजिनच्या गाड्या बाजारात असतील. बांधकामविकासकांची वाहने मशिने सीएनजीवर करण्याचे नियोजन सुरू आहे.

देशात 17 महामार्ग असे बनवत आहोत ज्या ठिकाणी विमानेदेखील उतरू शकतील. झोझीला टनेलच्या विकासकामामध्ये 5 हजार कोटींची बचत केली. आहे. पुण्यातील शिरूर ते वाघोली दरम्यान 4 लेनचा उड्डाणपूल बनवत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

योग, प्राणायम, व्यायामाकडे सर्वांनी लक्ष द्यावे. सध्याच्या कोरोना काळात उत्तम आरोग्य आणि व्यायाम आपलं कवच आहे. असंही गडकरी यांनी यावेळी सांगितले.