जीएसटीमुळे एकावर एक फ्रीच्या ऑफर्स बंद

देशात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्यानंतर एकावर एक फ्री सारख्या ऑफर्स देणे कंपनीना भारी पडणार आहे. जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पाकीटबंद उत्पादने आणि फूड सर्व्हिसेस कंपन्यांनी अशा ऑफर्स बंद केल्यात.

Updated: Aug 3, 2017, 09:44 AM IST
जीएसटीमुळे एकावर एक फ्रीच्या ऑफर्स बंद title=

नवी दिल्ली : देशात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्यानंतर एकावर एक फ्री सारख्या ऑफर्स देणे कंपनीना भारी पडणार आहे. जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पाकीटबंद उत्पादने आणि फूड सर्व्हिसेस कंपन्यांनी अशा ऑफर्स बंद केल्यात.

जीएसटीअंतर्गत कंपन्यांकडून ग्राहकांना कोणतीही वस्तू फ्री दिली जात असेल तर त्या वस्तूवर कंपनीला अधिक कर भरावा लागेल. देशातील मोठी बिस्कीट कंपनी पारले प्रॉडक्टसचे मार्केटिंगिंग हेड मयांक शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही बाय वन गेट वन फ्री ऑफर्स बंद करत आहोत आणि सरळ डिस्काउंट देणार आहेत. यामुले व्यवसायात त्रास होत असला तरी जीएसटीअंतर्गत करणे जरुरीचे आहे. 

देशातील दोन मोठ्या फूड सर्व्हिसिंग कंपन्या ज्युबिलंड फूडवर्क्स (डॉमिनोज पिझ्झा, डकिन डोनट्स) आणि यम रेस्ट्रॉरंट(पिझ्झा हट) ही बाय वन गेट वन ऑफर्स बंद करणार आहेत. 

कर तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही कंपनी कोणतीही वस्तू फ्रीमध्ये देत असेल तर त्या वस्तूवर त्यांना जीएसटी द्यावा लागेल. यात फार्मास्युटिकल कंपन्या तसेच डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत प्रॉडक्टसचाही समावेश आहे.