जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट

ऑक्टोबर महिन्यात जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. 

Updated: Nov 28, 2017, 04:23 PM IST
जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट title=

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. 

जीएसटीच्या उत्पन्नात घट

इंटिग्रेटेड जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न इनपुट क्रेडिट परत करण्यासाठी वापरल्यानं एकूण उत्पन्नात घट आल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभागाच्या आकडेवारीत समोर आलंय. याशिवाय ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या दरात लक्षणीय कपातही करण्यात आली. त्याचाही परिणाम एकूण उत्पन्नावर झालाय. नोव्हेंबर महिन्यात जीएसटीच्या एकूण उत्पन्नात आणखी घट येण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये भाजपची व्होट बँक डळमळीत 

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जीएसटीच्या मुद्दयानं पुन्हा डोकं वर काढलंय. कारण देशात सर्वात मोठ्या संख्येनं असलेले सुरतचे कापड व्यापारी जीएसटीवर नाराज आहेत. त्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांपासून हक्काची असलेली भाजपची व्होट बँक सध्या डळमळीत होताना दिसत आहे.

व्यापा-यांमध्ये भाजपविरोधात मोठी ना्राजी

सुरत म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते कपडे आणि इथला कापड उद्योग. मात्र गेल्या चार महिन्यांपासून या उद्योगाला अवकळा सुरू झाल्या आहेत. या अवकळा आहेत जीएसटीच्या. जीएसटीमुळे सुरतमधला व्यापारी पार मेटाकुटीला आलाय, पॉवरलूम उद्योगपतीपासून ते व्यापारी आणि त्याच्या कापड्याच्या गाठी उचलणा-या मजुरापर्यंत सर्वचांच्या रोजगारावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे व्यापा-यांमध्ये भाजपविरोधात मोठी ना्राजी आहे.