गुजरात निवडणुक: राहुल गांधींनी दिली रणछोडजी मंदिराला भेट, पूजा करून घेतले दर्शन

राहुल गांधी अरावल्ली जिल्ह्यातील शामलीजी मंदिरात जाऊनही दर्शन घेणार आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 10, 2017, 02:05 PM IST
गुजरात निवडणुक: राहुल गांधींनी दिली रणछोडजी मंदिराला भेट, पूजा करून घेतले दर्शन title=

अहमदाबाद : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मंदिर दौरा गुजरात विधानसभा निवडणुकीत अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधींनी रविवारीही गुजरातमधील रणछोडजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राहुल यांनी येथे मनोभावे पूजाही केली. चर्चा आहे की राहुल गांधी अरावल्ली जिल्ह्यातील शामलीजी मंदिरात जाऊनही दर्शन घेणार आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा शनिवारी (9 डिसेंबर) पार पडला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली सगळी ताकद एकवटली आहे. दरम्यान, राहुल गांधींनी रणछोडजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले तेव्हा, त्यांच्यासोबत कॉंग्रेस प्रभारी अशोक गेहलोतही होते. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी आतापर्यंत 20 मंदिरांना भेट दिली आहे. निवडणुक प्रचारातील प्रचारसभा, पदयात्रा, मेळाव्यांसोबतच राहुल गांधीं यांचा मंदिरदौराही तितकाच चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्यामुळे गांधी यांच्या लोकप्रियतेते वाढ होत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणने आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या गुजरातमधील मंदिर प्रवेशाबात गुजरातचे मुख्यमंत्री तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी यांच्या मंदिरभेटीवर टीका केली आहे. राहुल गांधी गुजरातमधील मंदिरांमध्ये जात आहेत. मात्र, ते दिल्लीतील मंदिरात का जात नाहीत? असा सवालही भाजप नतृत्वाने विचारला आहे.

विशेष असे की, राहुल गांधी यांनी मंदिर दर्शनांमध्ये 2012मधील प्रचार कालावधीतील तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकले आहे. या वर्षी राहुल गांधी यांनी 50 गेल्या दिवसांत 4 वेळा गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यांमध्ये राहुल गांधींनी 20 पेक्षाही अधिक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 2012च्या निवडणुकीत मोदी केवळ 6 मंदिरात गेले होते. राहुल यांचे मंदिरात जाने हे सॉफ्ट हिंदुत्व, तसेच भाजपकडून केल्या जाणाऱ्या हिंदू विरोधी आणि अल्पसंख्यांकाचे लांगूलचलन अशा आरोपांना प्रत्युत्तर असल्याची चर्चा होत आहे.