पंतप्रधानांनी भेट दिलेल्या मोरबी रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण? व्हायरल फोटो मागचं सत्य काय?

पंतप्रधानांच्या भेटीआधी रुग्णालयाला रंगरंगोटी करण्यात आलीय

Updated: Nov 2, 2022, 12:01 PM IST
पंतप्रधानांनी भेट दिलेल्या मोरबी रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण? व्हायरल फोटो मागचं सत्य काय? title=

गुजरातमधील (gujarat) मोरबी पूल दुर्घटनेत (Morbi Bridge Collapse) 132 पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणात आता चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दुर्घटनेपासूनच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, या अपघातानंतर दुर्घटनेत बचावलेल्या जखमींना दाखल करण्यात आलेले मोरबी (Morbi)सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (morbi civil hospital) चर्चेत आले आहे. या जखमींची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भेट घेणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर रातोरात संपूर्ण रुग्णालयाचा कायापालट करण्यात आला. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेल्या रुग्णालयात रंगकाम सुरु असल्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध करून विरोधकांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला होता. काँग्रेसने (Congress) याला शोकांतिका म्हटले, तर आम आदमी पक्षाने (AAP) ही भाजपच्या (BJP) फोटोशूटपूर्वीची (Photoshoot) तयारी असल्याचे म्हटले होते.

या दुर्घटनेनंतर पंतप्रधानांनी (PM Modi) घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. मोदींनी काही वेळ घटनास्थळी पाहणी केली तसेच बचावकार्याचाही आढावा घेतला. यानंतर पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात (morbi civil hospital) जाऊन जखमींची भेट घेतली. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. मात्र यानंतर सर्वत्र 126 क्रमांकाच्या बेडची चर्चा सुरु आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये 125 क्रमांकाच्या बेडवर असलेला रुग्ण दुसऱ्या एका फोटोमध्ये 126 क्रमांकाच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. पंतप्रधान मोदी त्या रुग्णाची चौकशी करताना दिसत आहेत.

'फोटोशूटपूर्वीची तयारी'; जखमींना भेटायला येणाऱ्या पंतप्रधानांसाठी रुग्णालयात रंगरंगोटी?

राष्ट्रीय जनता दलानेही (RJD) तीन फोटो ट्विट केले आहेत. तिन्ही मध्ये बेड (Bed) क्रमांक 126 दाखवण्यात आला आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये, "बेड नंबर 126 ची कथा काय आहे?" असे म्हटले आहे. या तीनपैकी दोन फोटोंमध्ये एकच माणूस दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये दुसराच रुग्ण 126 क्रमांकाच्या बेडवर दिसत आहे. तसेच दोन्ही बेडवर असलेल्या रुग्णाच्या पायाच्या प्लास्टरवरुनही चर्चा सुरु आहे. कारण 31 ऑक्टोबरच्या फोटोत त्याच्या पायावर छोटीशी पट्टी बांधलेली आहे. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरला मोठे प्लास्टर करण्यात आले आहे. तपासात या रुग्णाचे नाव अश्विन असल्याचे समोर आले आहे. 

"आधी एक छोटीशी पट्टी होती. त्यानंतर एक्स-रे काढला, तेव्हा कळलं की फ्रॅक्चर आहे. त्यानंतर प्लास्टर बांधला आहे," असे अश्विनने लल्लन टॉपसोबत बोलताना सांगितले. 126 नंबरच्या बेडबाबतही अश्विनने खुलासा केला. "आधी मी 125 नंबर वरच्या बेडवर होतो. नंतर माझ्या शेजारी एक महिला होती, जी दुसऱ्या वॉर्डमध्ये गेली होती. म्हणून मी 126 नंबरच्या बेडवर आलो," असे अश्विनने सांगितले.

"8-10 वर्षे काही होणार नाही"; मोरबी पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या कंपनींच्या मालकाचा दावा ठरला फोल

नेमका वाद काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मोरबी हॉस्पिटलमध्ये घाईघाईने रंगरंगोटी करण्यात आली. यासोबतच रुग्णांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये स्वच्छ बेडशीट, उशा इत्यादींचा समावेश होता. याचे अनेक फोटोही व्हायरल झाले असून, त्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साफसफाई आणि दुरुस्ती सुरु असल्याचे दिसत आहेत. पंतप्रधान येणार असे समजतात तेव्हा संपूर्ण रुग्णालयाचा कायापालट झाला. तिथे नवीन वॉटर कुलर, नवीन बेड आणण्यात आले होते. मात्र, यावर भाजपकडून कोणतेही स्पष्टीकरण किंवा उत्तर आले नाही. प्रशासनाने हे नित्याचे काम असल्याचे सांगितले.