मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा सगळ्यागोष्टी स्तब्ध केल्या आहेत. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 60 हजार 960 कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 3293 लोकांचा मृत्यू झाला असून 2,61,162 कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. (Gujarat Couple, Who Lost Their Only Son Due To COVID-19, Breaks FD To Help Other Patients) बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, 29,78,709 कोरोनाबाधित ऍक्टीव केसेस आहेत.
कोरोनाचा वाढता आकडा पाहता सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडली आहेत. एकाबाजूला कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांना योग्य सोईसुविधा मिळत नाही. अत्यावश्यक सेवेत येणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी प्रचंड तणावात काम करत आहेत.
India reports 3,60,960 new #COVID19 cases, 3293 deaths and 2,61,162 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,79,97,267
Total recoveries: 1,48,17,371
Death toll: 2,01,187
Active cases: 29,78,709Total vaccination: 14,78,27,367 pic.twitter.com/ZfG2CWNMzu
— ANI (@ANI) April 28, 2021
कोरोनामुळे अनेकांनी आपली आपल्या जवळच्यांना गमावलं आहेत. पण तरी देखील आपलं दुःख बाजूला ठेवून काहींनी मदतीचा हात पुढे केला आहे. असाच एक प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. एका दाम्पत्याने कोरोनामुळे आपला मुलगा गमावला. तरी देखील या पालकांनी कोरोनाच्या आताच्या परिस्थितीत मदतीचा हात पुढे केला आहे.
या दाम्पत्याने आपली 15 लाखाची एफडी मोडून गरजूंना मदत करण्यासाठी दान केली आहे. रसिक मेहता आणि कल्पना मेहता असं या दाम्पत्याने नाव आहे. हे जोडपं गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहत असून त्यांनी कोरोनाबाधित गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्यावर्षी मेहता दाम्पत्यांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला. मुलाच्या भविष्याकरता त्यांनी 15 लाखाच्या एफडीची तरतूद करून ठेवली होती. पण त्यांनी या कोरोनाकाळात आपल्या मुलाला गमावलं. मुलाच्या निधनानंतर त्याच्या भविष्यासाठी ठेवलेले पैसे त्यांनी कोरोनाबाधितांना दान करण्याचा निर्णय घेतला.
क्वारंटाईनमध्ये असलेल्या 200 कोरोनाबाधितांना त्यांनी काही किट आणि आवश्यक त्या गोष्टींचा पुरवठा केला आहे. 350 लोकांना त्यांनी कोरोना लस घेण्यास मदत केली आहे. मेहता कुटूंब दररोज सकाळी घराबाहेर पडून गरजू लोकांचा शोध घेतात आणि त्यांना मदत करतात.