मुंबई : राज्याच्या वाट्याला आलेले मोठे प्रकल्प हे गुजरातने (Gujrat) पळवण्यावरुन आतापर्यंत चांगलंच राजकारण तापलंय. नुकतंच वेदांत फॉक्सकॉन (vedanta foxconn project) हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्रावर (Maharashtra) सर्जिकल स्ट्राईक केलंय. महाराष्टाच्या वाट्याला आलेला आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून (Ncp) करण्यात आलाय. (gujarat grabs another mega project with Tatas and airbus after vedanta foxconn project)
वेदांत फॉक्सकॉनपाठोपाठ आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. नागपूरमधील मिहानमध्ये (Mihan Nagpur) टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) होणार होता. मात्र हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असं म्हटलं होतं. मात्र गुजरातनं हा प्रकल्पही पळवला. यावरुन राजकारण चांगलंच तापलंय.
या टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला नेण्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. "गुजरातनं महाराष्ट्रावर केलेला हा सर्जिकल स्ट्राईक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी केलीय. त्यामुळे आता या टीकेवर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.