भारतात प्रथमच धरणाखालून जाणार रस्ता, पाण्याखाली खोदणार बोगदा; 'या' राज्याचा निर्णय

Himachals Underwater Marvel: हिमाचल प्रदेश सरकारने गोविंद सागर धरणाखालून जाणार रस्ता बांधण्याचा विचार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 17, 2024, 10:28 AM IST
भारतात प्रथमच धरणाखालून जाणार रस्ता, पाण्याखाली खोदणार बोगदा; 'या' राज्याचा निर्णय title=
Himachals Underwater Marvel Indias First Lake Tunnel build underwater

Himachals Underwater Marvel: हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर शहराला किरतपूर आणि मनाली जोडण्यासाठी चक्क धरणाखालून रस्ता बांधण्याची तयारी सरकार करत आहे. गोबिंद सागर धरणाखालून बोगदा तयार करण्याच्या विचार हिमाचल सरकारकडून करण्यात येत आहे. हा मार्ग झाल्यास धरणाखालून जाणारा हा देशातील पहिला प्रयोग असेल. या प्रकल्पासाठी जर्मनीतील तज्ज्ञ आणि सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. 

गोविंद सागर तलाव या धरणाखाली टनेल तयार करुन हा रस्ता तयार केला जाणार आहे. गोविंद सागर तलाव हिमाचल प्रदेशच्या ऊना आणि बिलासपूर जिल्ह्यात आहे. याची लांबी सुमारे 56 किमी असून रुंदी 3 किमी इतकी आहे. या धरणाखालून रस्ता तयार झाल्यानंतर लुहणू मैदानापासून फोरलेनपर्यंत जाणार आहे. तसंच, हा मार्ग बिलासपूर शहरासाठी संजीवनी ठरणार आहे. 

किरतपुर-मनाली फोरलेन सुरू झाल्यानंतर बिलासपूर शहराचा संपर्क मुख्य मार्गापासून तुटला होता. त्यामुळं या शहराच्या आर्थिक स्थितीवर फटका बसला होता. आर्थिक स्थिती मंदावली होती. त्यामुळं जर हा मार्ग झाला तर व्यापारी आणि उद्योगपतींसाठी फायद्याचा ठरणार आहे. 

कसा असेल मार्ग?

 या धरणातील तलावामुळं बिलासपूर शहराला किरतपूर आणि मनालीदरम्यानच्या चार लेन मार्गाशी जोडले जाईल, असं हिमाचलचे तंत्रशिक्षण मंत्री राजेश धरमानी यांनी सांगितलं आहे. या मार्गामुळं पर्याटन क्षेत्रालाही विकास होणार आहे. या मार्गासाठी केंद्र सरकारच्या सेतु भारतम योजनेंतर्गंत बजेटसाठी प्रस्तावित केला जाईल. प्रकल्पासाठी शंभर कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे. तसंच, धरणाखालील मार्गासाठी उन्नत इमर्शन टनल पद्धती आणि टनल बोरिंग मशीचा वापर करुन हा पुल तयार केला जाईल. इमर्शन टनल पद्धतीमध्ये बोगद्याचे काही भाग जमीनीवर बनवून धरणाखाली स्थापित करण्यात येईल. टनल बोरिंग मशीनने बोगद्याच्या खाली खोदकाम करुन त्याला अधिक सुरक्षित आणि टिकाऊ बनवण्यात येईल. 

पर्यावरणाला हानी पोहोचेल का?

पर्यावरण संतुलनाचा विचार करुन या प्रकल्पासाठी अत्याधुनिक आणि शाश्वत जर्मन तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यासाठी इमर्शन टनल तंत्रज्ञान आणि टनल बोरिंग मशीन वापरले जाईल. हा प्रकल्प शहरासाठी वरदा ठरणार आहे.  हिमाचल प्रदेश व्यतिरिक्त संपूर्ण देशासाठी एक उदाहरण म्हणून समोर येईल.