बडोदा : हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. जंगलात २ जण बसलेले आहेत, आणि एका सिंहाला ते आपल्या हातातील कोंबडा दाखवत आहेत. पण त्याला खायला न देता त्यांची गंमत करतायत. सिंह जंगलाचा राजा, सिंहाला सर्वच घाबरतात, पण येथील स्थानिकांनी सिंहाची गंमत केलीय. सिंहाची अशी केविलवाणी स्थिती करणे तसं योग्य नाही. प्राण्यांची अशी गंमत करणे, त्यांना त्रास देणे बेकायदेशीर आहे. व्हिडीओ जर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला खालील गोष्टी लक्षात येतील.(खाली संपूर्ण व्हिडीओ पाहा)
जंगलात २ जण चटईवर बसलेले आहेत, एकाच्या हातात कोंबडा आहे, जवळच सिंह उभा आहे. सिंहाला कोंबड्याचं आमिष दाखवलं जात आहे. सिंह कोंबड्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतोय. पण हा व्यक्ती घाबरत नाहीय. ५ ते १० फुटांवर हा सिंह उभा आहे. प्राण्यांची असा त्रास देणे बेकायदेशीर असलं तरी या व्यक्तीला आपल्या जीवाचं काही सोयरं सूतक नाहीय. (पाहा हा व्हिडीओ)
एवढंच नाही पुन्हा पुन्हा, हा व्यक्ती सिंहाला कोंबडा दाखवून, पुन्हा मागे घेतोय. हा व्यक्तीनंतर कोंबडा सिंहाच्या बाजूने फेकून देतो, आणि एका झडपेत सिंह कोबंड्याला त्याच्या जबड्यात पकडतो. मात्र हे पाहून वाटतं, जर सिंहाने या व्यक्तीवरच झडप घातली असती तर काय झालं असतं.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ७ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींमधून ३ अहमदाबादचे आणि ४ स्थानिक लोक आहेत. स्थानिक लोकांसोबत जंगलात गेल्यानंतर सिंहाला ते त्रास देत होते. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.