...तर भारत सरकार मागे हटणार नाही -राजनाथ सिंह

राजनाथ सिंह सध्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत.

Updated: Jun 8, 2018, 07:17 AM IST
...तर भारत सरकार मागे हटणार नाही -राजनाथ सिंह

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात कितीही अडथळे आले तरी भारत सरकार त्यात मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली आहे. राजनाथ सिंह सध्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. रमझान महिन्यापुरतं काश्मीर खोऱ्यात तपास मोहीम आणि छापासत्रांना विराम देण्यात आला आहे. त्यासंबंधीची आढावा बैठकही राजनाथ सिंह यांनी घेतली. दरम्यान सीमेपलिकडून हल्ला किंवा घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास, त्याला तोडीसतोड प्रत्त्युत्तर देण्याचा अधिकार सुरक्षा यंत्रणांनी आपल्याकडे राखून ठेवलाय.