गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज आहेत. मागच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे असलेली अर्थ आणि नगरविकास ही खाती त्यांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शपथविधीला दोन दिवस उलटल्यानंतरही पटेल यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारलेला नाही. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 31, 2017, 03:34 PM IST
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज title=

अहमदाबाद : गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज आहेत. मागच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे असलेली अर्थ आणि नगरविकास ही खाती त्यांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शपथविधीला दोन दिवस उलटल्यानंतरही पटेल यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारलेला नाही. 

हा आत्मसन्मानाचा प्रश्न असल्याचं भाष्य करत पटेल यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली असतानाच काँग्रेस आणि पाटिदार नेते हार्दिक पटेल यांनीही पटेलांच्या बंडखोरीला हवा दिली आहे. त्यांनी नितीन पटेल यांना पाठिंबा जाहीर केला असून उद्या, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मेहसाणा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यांनी 10 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये यावं, त्यांचा उचित सन्मान केला जाईल असा दावा काँग्रेसमधून केला जातो आहे.