अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर...

Haridwar Ganga River : हरिद्वारमध्ये एका महिलेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवून मारलं आहे. चमत्काराच्या आशेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 25, 2024, 10:52 AM IST
अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर... title=

Ganga River : उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बुधवारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  हरिद्वारमध्ये अंधश्रद्धेने पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी घेतला. पालकांनी चमत्कारिक उपचार करण्याच्या नावाखाली मुलाची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. हरिद्वारच्या हर की पैडी इथल्या गंगा घाटावर मावशीने पाच वर्षाच्या निष्पाप मुलाला गंगा नदीत बुडवून ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मावशीला अटक केली. पोलीस तपासात हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीहून आलेले हे कुटुंब बुधवारी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलासह हर की पैडी इथे पोहोचले होता. मुलाच्या पालकांसोबत कुटुंबातील आणखी एक सदस्य तिथे होता. मुलाच्या मावशीने मुलाला पाण्यात बुडवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुलावर कुटुंबियांनी केलेली क्रूरता पाहून लोक संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. दिल्लीहून हे कुटुंब पाच वर्षांच्या मुलासह इथं आलं होतं. कुटुंबीयांनी मुलाला ब्रह्मकुंडात नेले आणि गंगेत बुडवले. कुटुंबिय मुलाला वारंवार गंगेत बुडवत राहिले. आजूबाजूच्या लोकांनी मुलाला बुडवताना पाहिल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणाचेही न ऐकता मुलाला पाण्यात बुडवने सुरुच ठेवलं. त्यानंतर लोकांनी जबरदस्ती करुन मुलाला पाण्याच्या बाहेर काढलं. त्यानंतर लोकांनी कुटुंबियांना मारहाण सुरु केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ मुलाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

मुलाला बुडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चौकशीदरम्यान, मृत मुलाचे नाव रवी असल्याचे समोर आलं आहे. रवीचे वडील राजकुमार सैनी हे दिल्लीत फूल विकण्याचे काम करतात. रवीला रक्ताचा कर्करोग होता त्यामुळे तो दिल्लीत उपचार घेत होता. चार दिवसांपूर्वीच त्याला एम्स रुग्णालयात उपचारांसाठी नेले होते. डॉक्टरांनी रवीची प्रकृती पाहून त्याला घरी नेण्याचा सल्ला सैनी कुटुंबिना दिला. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला हरिद्वारला आणले. यावेळी त्यांच्यासोबत राजकुमारची पत्नी आणि मेहुणी उपस्थित होती. चमत्काराच्या आशेने तिघेही ब्रह्मकुंड येथे पोहोचले आणि त्यांनी रवीला पाण्यात बुडवलं. रवीची मावशी त्याला वारंवार पाण्यात बुडवून काढत होती.

मुलाचा रस्त्यात झाला मृत्यू

डॉक्टरांनी आशा सोडल्यानंतर सैनी कुटुंबियांना एका महिलेने मुलाला गंगेत स्थान करुवून आणा असे सांगितले होते. त्यामुळे सैनी कुटुंबिय हरिद्वारला आलं होतं. तिथे त्यांनी रवीला वारंवार गंगेत स्नान करायला लावले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वाटेतच रवीचा मृत्यू झाला होता. तरीही गंगेत स्नान केल्याने मुलगा बरा होईल, असे कुटुंबियांना वाटत होता.