12 वर्ष आणि त्याहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केल्यास 'मृत्यू दंड'

12 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केल्यावर दोषीला कठोर शिक्षा देण्यात येणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 28, 2018, 10:06 AM IST
12 वर्ष आणि त्याहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केल्यास 'मृत्यू दंड'  title=

मुंबई : 12 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केल्यावर दोषीला कठोर शिक्षा देण्यात येणार आहे. 

12 वर्ष किंवा त्याहून कमी वय असलेल्या मुलीवर बलात्कार झाल्यास दोषीला मृत्यू दंड देण्यात येणार आहे. मंगळवारी 27 फेब्रुवारी रोजी या कायद्याला मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रीमंडळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला मृत्यूदंड किंवा कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. 14 वर्षाहून ही शिक्षा कमी नसणार आहे. 

महिलेसोबत सामुहिक बलात्कार 

एका महिलेचं अपहरण करून सामूहिक बलात्काराची घटना घडली. महिलेने पोलीस ठाण्यात याबाबतची चौकशी केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी आपल्या गावी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिच्यासमोर रस्त्यावर गाडी थांबवून रासीद आणि त्याच्या दोन साथीदारांनी अपहरण करून सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने दोषींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र महिलेने सावधपणे पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवलाा आहे.