सर्वात अगोदर कोरोना व्हॅक्सीन कुणाला दिली जाणार? आरोग्य मंत्र्यांची माहिती

भारतीय नागरिकांना दिलासा देणारी माहिती 

Updated: Oct 5, 2020, 09:30 AM IST
 सर्वात अगोदर कोरोना व्हॅक्सीन कुणाला दिली जाणार? आरोग्य मंत्र्यांची माहिती  title=

मुंबई : कोरोना महामारीविरोधात जगभरात लस शोधण्याच काम सुरू आहे. अनेक देशातील लस तिसऱ्या टप्प्यात आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी कोरोना व्हॅक्सीनच्या ब्लू प्रिंटबद्दल माहिती दिली. त्यांच म्हणणं आहे की, पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाची लस तयार होईस. 

कोरोनाच्या व्हॅक्सीनबाबत जगभरात प्रयत्न सुरू आहे. अनेक देशांनी तर व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा देखील केली आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याच व्हॅक्सीनला जगभरात वापरण्याची परवानगी मिळालेली नाही. अशातच आरोग्य मंत्र्यांनी १३० करोड भारतीय जनतेने दिलासादायक माहिती दिली आहे. 

डॉ. हर्षर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड व्हॅक्सीन ब्लू प्रिंट लोकांसमोर मांडली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ४०-५० करोड कोविड-१९ व्हॅक्सीन तयार करण्याची योजना आखली आहे. आमचं लक्ष्य हे जुलै २०२१ पर्यंत २० ते २५ करोड लोकांपर्यंत व्हॅक्सीन पोहोचवणं हे आहे. राज्याला ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत प्राथमिकता असणाऱ्या समूहाला व्हॅक्सीन दिलं जाणार आहे. 

यांना देणार सर्वात प्रथम व्हॅक्सीन 

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, Covid-19 कोरोना व्हॅक्सीनच प्राधान्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. व्हॅक्सीनची खरेदी केंद्र सरकार करणार असून प्रत्येक व्हॅक्सीन ट्रॅक केलं जाणार आहे. भारतीय व्हॅक्सीन निर्मात्यांवर पूर्ण सरकारी मदत दिली जाणार आहे.