स्वत:चा जीव धोक्यात टाकून दुसऱ्याला कसं वाचवलं पाहा, असा ड्रायव्हर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल

गेल्या काही दिवसांपासून 'हेवी ड्रायव्हर' हा शब्द ट्रेन्डींग झाला आहे.

Updated: Jun 25, 2021, 02:14 PM IST
स्वत:चा जीव धोक्यात टाकून दुसऱ्याला कसं वाचवलं पाहा, असा ड्रायव्हर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात. त्यात काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात, तर काही लोकांना थक्कं करणारे. काही व्हिडीओ तर इतके थरारक असतात की, लोकांच्या अंगावर काटा उभा राहातो. असाच तुम्हाला एका क्षणासाठी स्तब्ध करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'हेवी ड्रायव्हर' हा शब्द ट्रेन्डींग झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये आता हा प्रश्न पडला आहे की, हा  हेवी ड्रायव्हर कोण? आणि त्याला ही पदवी का मिळाली आहे?

आजपर्यंत तुम्ही बहुदरीचे अनेक किस्से ऐकले  किंवा पाहिले असतीलच. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गाय निर्जन रस्त्यावर आपल्या धूंदीत चालत आहे.

इतक्यात समोरुन एक ट्रक सुसाट आला. परंतु रस्त्यात समोर गाय असल्यामुळे त्या ट्रक ड्रायव्हरने या गाईला वाचवण्यासाठी असा काही ब्रेक मारला की, तुम्हाला क्षणभर वाटेल की, आता हा ट्रक गाईला ठोकतोय की काय? परंतु या ट्रक चालकाचा त्याच्या ट्रकवर असा काही कंट्रोल होता की, त्याने ना त्या गाईला ठोकले, ना आपला ट्रक पडू दिला. ज्यामुळे गाईचे प्राण पण वाचले आणि ट्रकचे ही नुकसान झाले नाही. त्यामुळेच या ड्रायव्हरला 'हेवी ड्रायव्हर' ही पदवी मिळाली.

तुम्हाला कदाचित हे वाचून समजणार नाही, परंतु तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यावर या ड्रायव्हरला 'हेवी ड्रायव्हर'चं म्हंटले गेले पाहिजे असे तुम्हाला देखील वाटेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'sarcasm.social' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तर काही लोकं या ड्रायव्हरचे कौतुक करत आहेत.