७० टनाची मशिन घेऊन महाराष्ट्रातून केरळला पोहोचण्यास ट्रकला लागले वर्ष

एकदम वजनाने भारी मशिन. हे मशिन खास स्पेस प्रोजेक्टसाठी बनविण्यात आले आहे. अत्यंत जड मशिन अखेर केरळला पोहोचले आहे.  

Updated: Jul 22, 2020, 03:14 PM IST
७० टनाची मशिन घेऊन महाराष्ट्रातून केरळला पोहोचण्यास ट्रकला लागले वर्ष

मुंबई : एकदम वजनाने भारी मशिन. हे मशिन खास स्पेस प्रोजेक्टसाठी बनविण्यात आले आहे. अत्यंत जड मशिन अखेर केरळला पोहोचले आहे. सोमवारी तिरुअनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएससीसी) येथे पोहोचविण्यात यश आले आहे.

हे हेवीवेट मशिन महाराष्ट्रातून केरळमध्ये एका ट्रकमधून पाठविण्यात आले होते आणि तेथे पोहोचण्यास एका वर्षापेक्षा थोडा जास्त वेळ लागला. या मशिनचा प्रवास चार राज्यांतून झाला. हे मशिन रविवारी केरळमध्ये पोहोचले. सोमवारी या मशिनला त्वरित अवकाश केंद्रात दाखल करण्यात आले.

मशिन घेऊन आलेल्या स्टाफ सदस्याने सांगितले की, 'आम्ही आमचा प्रवास ८ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथून सुरु केला. आता चार राज्यांतून एका वर्षानंतर आम्ही तिरुअनंतपुरममध्ये येऊ शकलो आहोत. '

महत्त्वाचे म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (व्हीएससीसी) एक एरोस्पेस हॉरिझाँटल ऑटोक्लेव्ह मशिनची ऑर्डर दिली होती. वजन न करता सामग्री तयार करण्यासाठी हे मशिन वापरले जाते. अशा मोठ्या मशिनचे वजन ७० टन होते, ज्याची उंची ७.५मीटर आणि रुंदी ६.५ मीटर आहे. हे मशिन महाराष्ट्र, नाशिक येथे बनवले गेले होते आणि केरळ व्हीएससीसीसाठी अधिकृतरित्या तयार करण्यात आले होते. जास्त वजन असल्यामुळे मशि्न जहाजा ऐवजी रस्त्याने वाहतूक करावी लागली.