४ वर्षाच्या मुलालाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस

कर्नाटक सरकारने (Karnataka Government)राज्याच्या वाहतूक नियमांमध्ये (Traffic Rule) मोठा बदल केला आहे. राज्य सरकारने दुचाकी (two-wheeler)वाहनावर प्रवास करणाऱ्या सर्वांना हेल्मेट (helmet)वापरणे आवश्यक केले आहे. नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. 

Updated: Oct 20, 2020, 07:26 PM IST
४ वर्षाच्या मुलालाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस title=

बंगळुरु : कर्नाटक सरकारने (Karnataka Government)राज्याच्या वाहतूक नियमांमध्ये (Traffic Rule) मोठा बदल केला आहे. राज्य सरकारने दुचाकी (two-wheeler)वाहनावर प्रवास करणाऱ्या सर्वांना हेल्मेट (helmet)वापरणे आवश्यक केले आहे. नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. 

कर्नाटक परिवहन विभागाच्या नव्या नियमानुसार, सर्व दुचाक्यांना हेल्मेट अनिवार्य करण्यात आलं आहे. यात ४ वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांचा समावेश आहे. नियमांमध्ये स्पष्ट लिहण्यात आलं आहे, ज्या व्यक्तीकडून नियमांचं उल्लंघन होईल, त्यांना दंड म्हणून ३ महिन्यासाठी ड्रायव्हिंग लायसेंस सस्पेंड करण्यात येईल.
 
परिवहन विभागाने म्हटलं आहे, रस्ते सुरक्षा समितीने १४ ऑक्टोबररोजी व्हिडीओ कॉन्फ्रन्स आयोजित केली होती, यात नियम तोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची शिफारस करण्यात आली, यानंतर या नियम संपूर्ण कर्नाटक राज्यात लागू करण्यात आला.

मोटर वाहन अॅक्टनुसार (Motor Vehicle Act) टू-व्हिलरवर प्रवास करणाऱ्यांसाठी हेल्मेट आवश्यक आहे. मोटर वाहन अॅक्ट २०१९ (संसोधित )नुसार बिना हेल्मेट प्रवास करताना पकडले गेल्यास १ हजार रुपयांचा दंड आहे. 

सध्या ही रक्कम कमी करून कर्नाटक सरकारने हा दंड ५०० रुपये केलेला आहे. कर्नाटकमध्ये १ कोटी ६५ लाख रजिस्टर्ड टू व्हिलर्स आहेत, एकट्या बंगळुरू शहरात ५९.९ लाख टू व्हिलर्स रजिस्टर्ड आहेत.