राजकीय फायद्यासाठी हिंसाचाऱ्यांसमोर राज्य सरकारनं गुडघे टेकले - हायकोर्ट

बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्या न्यायालयीन सुनावणीनंतर शुक्रवारी पंचकुलात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. पंचकुला, सिरसा समवेत चार राज्यांत पसरलेल्या या हिंसाचारावर सुनावणी करताना पंजाब - हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय. 

Updated: Aug 26, 2017, 02:09 PM IST
राजकीय फायद्यासाठी हिंसाचाऱ्यांसमोर राज्य सरकारनं गुडघे टेकले - हायकोर्ट title=

चंदीगड : बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्या न्यायालयीन सुनावणीनंतर शुक्रवारी पंचकुलात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. पंचकुला, सिरसा समवेत चार राज्यांत पसरलेल्या या हिंसाचारावर सुनावणी करताना पंजाब - हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय. 

कालचा दंगा पाहता सरकारनं हिंसाचाऱ्यांसमोर सपशेल गुडघे टेकल्याचंच दिसून येतंय, असं म्हणत कोर्टानं राज्य सरकारचे वाभाडे काढलेत. राज्य सरकारला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, काय होईल याचा अंदाजा होता परंतु, जाणून बुजून कोणतंही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही. सरकारनं आपल्या राजकीय फायद्यासाठी शहर जाळू दिलं, अशा शब्दांत कोर्टानं राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढलेत.