Gold Rate In India: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये उतार-चढाव पाहायला मिळत आहे. इंडियन बुलियन एण्ड ज्वेलर्स एसोसिएशन लिमिटेडने (IBJA) मंगळवारी सोन्याचे दर जारी केले आहेत. IBJAनुसार आज सोन्याच्या दरांमध्ये काही अंशी वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४६ हजार ४ रुपये तर चांदीचे दर ४३ हजार ६० रूपये किलो आहे.
#Gold and #Silver Opening #Rates for 12/05/2020#IBJA pic.twitter.com/YjoAXQo4Yb
— IBJA #StayHomeStaySafe (@IBJA1919) May 12, 2020
यापूर्वी सोमवारी संध्याकाळी IBJAने केलेल्या ट्विटनुसार २४ कॅरेट सोन्याचे दर ४ हजार ५७९ प्रती ग्रॅम होते. IBJAच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती ग्रॅम ४ हजार ४०८ रुपये होता. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रती ग्रॅम ३ हजार ६४८ रुपये होता.
#IBJA’s indicative #Retail selling #Rates for #Gold #Jewellery
To get these rates on your phone give a missed call on - 8955664433 pic.twitter.com/FSmE1NxkI7— IBJA #StayHomeStaySafe (@IBJA1919) May 11, 2020
दरम्यान सोमवारी जागतिक पातळीवरील उतार चढाव झाल्यामुळे सोन्याच्या वायद्यात किंचित घसरण दिसून आली. सोनं ०.०५ टक्क्यांनी घसरून ४५ हजार ७८९ रुपये प्रती १० ग्रॅम झाला. शिवाय चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. सोमवारी वायदा बाजारात चांदी ०.५७ टक्क्यांनी वधारली.
जर तुम्ही सामान्य ग्राहक असाल तर तुम्हाला IBJAने नमूद केलेल्या किंमतीवर दागदागिने खरेदी करण्यासाठी वेगळा मेकिंग चार्ज आणि ३ टक्के जीएसटी द्यावा लागेल.