गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ, तर ५४३ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Updated: Jul 19, 2020, 10:32 AM IST
गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ, तर ५४३ रुग्णांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासात ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत १० लाख ७७ हजार ६१८ लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २६,८१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ लोकांची आतापर्यंत कोरोना टेस्ट झाली आहे. १८ जुलैला ३ लाख ५८ हजार १२७ लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

देशात अनेक भागात अजूनही लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. ज्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत अशा शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू केला जात आहे.