'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल

Jara hatke: पूर्वी देशात बहुपती ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी  एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे.

Updated: Nov 13, 2022, 12:54 PM IST
'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल   title=
Himachal Pradesh in Chitkul village are different tradition

Himachal Pradesh: एकापेक्षा अधिक बायका करणं भारतात कायद्यानं गुन्हा आहे. पूर्वी देशात बहुपत्नीत्व (Polygamy) ही सामाजिक प्रथा (Social practice) असायची. पण स्वातंत्र्यानंतर (After independence) यावर बंदी घालण्यात आली आणि प्रत्येक महिलेला सन्मानानं जगण्याचा हक्क बहाल करण्यात आला. मात्र हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) एका छोट्याशा गावात एका महिलेला दोन किंवा दोनपेक्षा जास्त पुरुषांसोबत विवाह करावा लागतो. महाभारतामुळे (Mahabharat) गावात ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. नेमकी ही परंपरा कोणत्या गावात आहे? महिलेला का करावे लागते चार वेळा? जाणून घ्या सविस्तर माहिती...

हिमाचल प्रदेशमध्ये छितकुल (Chitkul villag) नावाचे एक गाव आहे. छितकुल हे गाव दिल्लीपासून (delhi) सुमारे 602 किलोमीटर अंतरावर आहे. गाव अतिशय दुर्गम भागात असून हिवाळा ( winter) सुरू होताच त्या भागात बर्फवृष्टी होते. चीन-तिबेट सीमेला (China-Tibet border) लागून असलेले छितकुल हे या भागात भारताचे अखेरचे गाव आहे. तेथे केवळ 471 मतदार आहेत. प्रत्यक्ष ताबा रेषा तेथून 60 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील परंपरा इतरांपेक्षा वेगळी आहे.  

वाचा : Twitter Blue Tick संदर्भात मोठी बातमी, Elon Musk ची ट्वीटवर पुन्हा नवी घोषणा! 
 
बहुपती परंपरा

दरम्यान छितकुल गावातील महिला दोन किंवा दोनपेक्षा जास्त पुरुषांसोबत विवाह करते. कारण छितकुल गावातील हिंदू विवाह कायदा (Hindu Marriage Act) आणि उत्तराधिकारी कायदा लागू होत नाही. महिला 4 पुरुषांसोबत विवाह करू शकते. बहुतांश वेळा एकाच कुटुंबातील 2 किंवा 4 भावांसोबत लग्न करते. ती सर्व पतींसोबत एकाच घरात राहते. महाभारतामुळे गावात ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

महाभारतील पांडवापासून प्रथा सुरू

महाभारत काळात पांडव अज्ञातवासात असताना छितकुल या गावात आले होते. काही काळ त्यांनी एका गुहेत वास्तव्य केले होते. त्यांना पाहून स्थानिकांनीही बहुपती परंपरा स्वीकारली. त्यानंतर या गावातील महिला दोन किंवा दोनपेक्षा जास्त पुरुषांसोबत विवाह करते. सर्व पतींसोबत महिला एकाच घरात राहते.

वाचा : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये? 

परंपरेचे पालन होते कसे?

एखादा भाऊ पत्नीसोबत खोलीत असेल तर तो दरवाजाबाहेर आपली टोपी ठेवतो. अशावेळी इतर पती खोलीत जात नाहीत. गावात हुंडाबंदी आहे. विवाहित मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क राहात नाही. महाभारत काळात पांडव अज्ञातवासात असताना या गावात आले होते. काही काळ त्यांनी एका गुहेत वास्तव्य केले होते. त्यांना पाहून स्थानिकांनीही बहुपती परंपरा स्वीकारली.   

या गावात फक्त एक ढाबा आणि दोन बस

गावात दिवसातून दोनच बस येते. एक चंडीगड तर दुसरी रिकांग पिओ येथे जाते. तर देशाच्या कोपऱ्यातील अखेरचे पोस्ट ऑफिस येथे आहे. केवळ 2 कर्मचारी कामावर आहेत. 15 वर्षांपूर्वी अखेरचे पत्र पोस्ट ऑफिसात आले होते. तसेच इयत्ता दहावीपर्यंत शाळा आहे. एकच शिक्षक असून, 21 विद्यार्थ्यांना तेच सर्व विषय शिकवतात. शेवटचा ढाबा आहे. तो एखादा टुरिस्ट स्पॉट बनला आहे. देशातील सर्वात स्वच्छ हवा छितकुल येथे आहे.