कटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा भारतासोबत मैत्री करा- हिना रब्बानी

पाकिस्तानच्याच माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला सुनावलं

Updated: Jan 13, 2019, 07:41 PM IST
कटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा भारतासोबत मैत्री करा- हिना रब्बानी title=

लाहोर : पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलं की, आर्थिक, राजकीय आणि लष्करी मदतीच्या बाबतीत अमेरिकेचा आश्रय घेण्यापेक्षा भारत आणि इतर शेजारील राष्ट्रांसोबत संबंध मजबूत केले पाहिजेत. हिना रब्बानी यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानला दोन्ही हातात कटोरा घेऊन सन्मान नाही मिळणार.' अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

पाकिस्तानच्या पहिल्या परराष्ट्र मंत्री (2011-2013) हिना रब्बानी यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानने सगळ्यात महत्वपूर्ण संबंध अमेरिकेच्या ऐवजी अफगाणिस्तान, भारत, ईरान आणि चीन सोबत ठेवले पाहिजे. अमेरिका त्याचा हकदार नाही आहे जेवढं महत्त्व त्याला पाकिस्तानात दिलं जातं. कारण आपली अर्थव्यवस्थाही अमेरिकेवर अवलंबून नाही आहे. जसं की सगळे समजतात.'

हिना ने पाकिस्तान को दिखाया आइना, कहा- 'कटोरा लेकर भीख मांगने से अच्छा है, भारत से दोस्ती कर लो'

हिना रब्बानी यांच्यात कार्यकाळात अमेरिकेने अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला ठार केलं होतं. हिना यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानला अमेरिकेकडून जास्त आशा नाही ठेवल्या पाहिजे. पाकिस्तानला अफगाण युद्धातून बाहेर पडलं पाहिजे. १७ वर्षापासून सुरु असलेल्या या युद्धात पाकिस्तानचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.'

हिना रब्बानी यांनी म्हटलं की, 'भारतासोबत लढून काश्मीर नाही जिंकता येणार. या मुद्द्यावर एकमेकांवर विश्वासपूर्ण वातावरण तयार करुन समस्या सोडवली जाऊ शकते. काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करुनच रस्ता निघू शकतो.' याआधी देखील हिना यांनी अनेकदा भारत-पाकिस्तान संबंधावर वक्तव्य केलं आहे.