कोणतीही मेहनत न करता सरकारी बँकेकडून लोन घ्यायचंय, मग जरूर वाचा

वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी दिली महत्वाची माहिती 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 26, 2018, 11:37 PM IST
कोणतीही मेहनत न करता सरकारी बँकेकडून लोन घ्यायचंय, मग जरूर वाचा  title=

मुंबई : वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी दिली महत्वाची माहिती 

आता इमानदार कर्जदारांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून कर्ज घेणं होणार अधिक सोपं. सरकारने अनेक सप्ताह बँकिंग क्षेत्रात चांगल्या घोषणा केल्या आहेत. सरकारने सांगितले की, सरकारी क्षेत्रात 20 बँकांमध्ये 31 मार्चच्या अगोदर 88,139 करोड रुपये देणार आहेत. 

कुमार यांनी सांगितले की, सरकारकडून घोषणा केलेला हा मुख्य उद्देश आहे. वेगवेगळ्या फिनटेक उपायांमध्ये दाखल केलेली जीएसटी रिटर्नमध्ये नगद प्रवाहाची माहिती मिळणार आहे. कुमारने सांगितले की, आधारावर बँक ऋण मंजुरी दिली आहे. 

सरकारी बँकेतून लोन घेणं होणार सोपं 

24 जानेवारी राजीव कुमार यांनी ट्विट केलं आहे, देशभरात 5 किमीमध्ये बँकिंग सुविधा, मोबाइल अॅपच्या माध्यमातून संपर्क करणं होणार अधिक सोपं. यामुळे इमानदार कर्जदारांना कर्ज घेणं होणार अधिक सोपं सरकारने याबाबत घोषणा केली की, सार्वजनिक क्षेत्रात 20 बँकेत 31 मार्चच्या अगोदर 88,139 करोड रुपयांची गुंतवणूक करणार. जेणे करून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्याचा अधिक लाभ होईल.