नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरणी जेलमध्ये गेल्यानंतर त्याची मानलेली कथित मुलगी हनीप्रीत इंसा फरार आहे.
तपास यंत्रणा हनीप्रीतला शोधत आहे, पण तीचा सुगावा अद्याप लागला नाही. पण सोशल मीडियावर तिचा एक मोबाईल नंबर व्हायरल झाला आहे. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार हनीप्रीतच्या त्या कथित क्रमांकावर लोक फोन करत असून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा फोन स्विचड ऑफ आहे.
सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीमला २० वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर फिल्म आणि टेलिव्हीजन दिग्दर्शकांची संस्था आयएफटीडीएने गुरमीत आणि हनीप्रीत यांची सदस्यता रद्द केली. ते सर्टीफिकेट आता मीडिया व्हायरल होत आहे. या सर्टीफिकेटवर हनीप्रीतचा मोबाईल नंबरही आहे. तो
868****777 आहे.
या क्रमांकाच्या व्हॉटसअॅपवर स्टेटसमध्ये राम रहीमचा फोटो आहे. फोटोमध्ये राम रहीम बाईकवर बसला आहे. तसेच हनीप्रीतने व्हॉट्सअॅप स्टेटस at School असे ठेवले आहे.