Gratuity | ग्रॅच्युटीची रक्कम कशी मोजली जाते? नोकरी करत असाल तर जाणून घ्या सर्व काही

जर तुम्ही दीर्घ काळापर्यंत एखाद्या कंपनीत /  संस्थेत काम करीत असाल तर, तुम्हाला ग्रॅच्युटीची रक्कम मिळते

Updated: Aug 5, 2021, 07:59 AM IST
Gratuity | ग्रॅच्युटीची रक्कम कशी मोजली जाते? नोकरी करत असाल तर जाणून घ्या सर्व काही title=

मुंबई : जर तुम्ही दीर्घ काळापर्यंत एखाद्या कंपनीत /  संस्थेत काम करीत असाल तर, तुम्हाला ग्रॅच्युटीची रक्कम मिळते. बहुतांश लोक जॉब बदलतात. त्यांना आशा असते की, कंपनीकडून ग्रॅच्युटी मिळेल. जाणून घ्या ग्रॅच्युटी ऍक्ट आणि ग्रॅच्युटी कॅल्कुलेशनची अन्य माहिती.

काय असते ग्रॅच्युटी
कोणत्याही कंपनीत / संस्थेत दीर्घ काळासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रोव्हिडंट फंडच्या सोबतच ग्रॅच्युटीसुद्धा मिळते. ग्रॅच्युटी कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीकडून मिळणारा अवार्ड असतो. जर कर्मचारी नोकरीच्या अटी पूर्ण करीत असेल तर, ठरलेल्या सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युटीची रक्कम पूर्ण मिळते.

ग्रॅच्युटी कधी मिळेल
ग्रॅच्युटीचा एक छोटा भाग कर्मचाऱ्याच्या सॅलरीमधून कापला जातो. परंतू मोठा भाग हा कंपनीकडून दिला जातो. जर कोणताही कर्मचारी एखाद्या कंपनीत 5 वर्षापर्यंत काम करीत असेल. तर त्याला ग्रॅच्युटी मिळते. 5 वर्षानंतर तो  कंपनी सोडणार असेल तर त्याला ग्रॅच्युटी मिळेल.

पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972
पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 अंतर्गत 10 जणांपेक्षा जास्त कर्मचारी काम करीत असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांन ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो. कोणत्याही कारणामुळे कर्मचाऱ्यांने नोकरी सोडल्यास तसेच ग्रॅच्युटीच्या अटी पूर्ण केल्यास त्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो. जर कोणतही संस्था ग्रॅच्युटी ऍक्टच्या अंतर्गत येत नसेल, तर ती ग्रॅच्युटीचा फायदा आपल्या कर्मचाऱ्याला देऊ शकते.

कशी कॅल्कुलेट होते ग्रॅच्युटीची रक्कम
ग्रॅच्युटी कॅल्कुलेट करण्याचे सूत्र आहे. 
एकूण ग्रॅच्युटीची रक्कम = शेवटचा पगार x (15/26)x (कंपनीत किती वर्ष काम केले)

समजा कोणत्याही कर्मचाऱ्याने 20 वर्षापर्यंत एकाच कंपनीत काम केले. त्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 75000 रुपये (बेसिक सॅलरी +महागाई भत्ता) तर त्या कर्मचाऱ्याला 8.65 लाख रुपये ग्रॅच्युटी मिळेल. ग्रॅच्युटी कॅल्कुलेशनच्या सूत्रामध्ये 26 दिवस मोजले जातात.