आदित्य एल 1 मिशन किती दिवसांचे? किती येणार खर्च? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Aditya L1 Mission: आदित्य एल 1 मिशनबद्दल देशवासियांना उत्सुकता लागली आहे. चंद्रानंतर भारताची इस्रो आता सुर्याच्या जवळ जाण्याचा करिश्मा करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य मिशन प्रक्षेपित केले जाणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 27, 2023, 12:42 PM IST
आदित्य एल 1 मिशन किती दिवसांचे? किती येणार खर्च? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या title=

Aditya L1 Mission: चांद्रयान 3 मिशनच्या उत्तूंग यशानंतर आता आदित्य एल 1 मिशनबद्दल देशवासियांना उत्सुकता लागली आहे. चंद्रानंतर भारताची इस्रो आता सुर्याच्या जवळ जाण्याचा करिश्मा करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य मिशन प्रक्षेपित केले जाणार आहे. दरम्यान या मिशनला आदित्ययन, सूर्ययान आणि सुराज्यन अशी नावे का दिली गेली नाहीत किंवा आपण या नावांनी का संबोधले जात नाहीत? याला किती खर्च येईल? फक्त L1 कक्षेत का स्थापित केले जात आहे? L1 कक्षेचे पृथ्वीपासून अंतर किती आहे? L1 ऑर्बिटपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल आणि तिथे पोहोचल्यानंतर आदित्य L1 काय काम करणार आहे? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

कमी बजेटचे मिशन

आदित्यला L1 कक्षेत का ठेवले जाईल? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आदित्य L1 चे बजेट जवळपास 378 कोटी आहे. सूर्याची L1 कक्षा ज्यामध्ये स्थापित केली जाईल ती पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमी दूर आहे. हे 15 लाख किमी अंतर कापण्यासाठी आदित्य मिशनला 125 दिवस लागतील. म्हणजेच चार महिन्यांनंतर ते L1 कक्षेत बसवले जाईल. 

पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून आदित्यचे प्रक्षेपण होणार आहे. हे मिशन पूर्णपणे मेड इन इंडिया असणार आहे.बंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने यातील पेलोड्स डिझाइनची रचना केली आहे.

पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाण्याची पाचवी मोहीम 

1. चांद्रयान 1- 22 ऑक्टोबर 2008
2. मार्स ऑर्बिटर मिशन - 5 नोव्हेंबर 2013
3. चांद्रयान 2 - 22 जुलै 2019
4. चांद्रयान 3- 14 जुलै 2023
5. आदित्य L1 मिशन - 2 सप्टेंबर 2023

ग्रहणापासून रक्षण 

एकूण सात पेलोड या मिशनमध्ये आहेत. त्यापैकी चार सूर्याकडे केंद्रित असतील. या पेलोड्सच्या मदतीने सूर्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा विशेष अभ्यास केला जाणार आहे. यामुळे सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि कोरोना समजण्यास मदत होईल. यासोबतच 3 पेलोड L1 च्या कक्षेचा अभ्यास करतील. 

आदित्यला L1 मध्ये का स्थापित केले जातेय? असा प्रश्नदेखील विचारला जातो. जगाच्या प्रत्येक भागामध्ये सुर्य ग्रहण पाहायला मिळते. ग्रहणामुळे सूर्याच्या अभ्यासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून L1 पॉइंट निवडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.