मोदी किती खोटं बोलाल? हृदयनाथ मंगेशकरांबाबत दिली चुकीची माहिती; संजय राऊत यांचा आरोप

मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं ते खोटे आहे. 'ने मजसी ने'ला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे.

Updated: Feb 10, 2022, 11:40 AM IST
मोदी किती खोटं बोलाल? हृदयनाथ मंगेशकरांबाबत दिली चुकीची माहिती; संजय राऊत यांचा आरोप title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत बोलताना हृदयनाथ मंगेशकरांबाबत (Hrudaynath Mangeshkar) माहिती दिली. मात्र, मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं ते खोटे आहे. 'ने मजसी ने'ला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे, असा टोला शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसने संशय घेतला. त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप मोदींनी केला होता. यावरून, राऊत यांनी मोदी धडधडीत खोटं बोलत असल्याचं म्हटलंय. 

मला जे बोलायचं होतं ते काल बोललो आहे. आता यापुढे जे बोलायचंय ते महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत बोलेन असा इशारा त्यांनी दिलाय. महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर कोरोना म्हणालात. पण, महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रामध्ये प्रेतं नाही पडली. आणि महाराष्ट्रात सुपर स्प्रेडर…? हे योग्य नाही, असे ते म्हणाले. 

त्यांच्या आधी कुणी पंतप्रधान झाले नाही, होणार नाही असं त्यांना वाटतंय. यूपीत 15 लोकसभा जागा लढणार आहोत. इतही राज्यात लढणार आहोत. याची त्यांना भीती वाटते, म्हणून आमच्या मागे राक्षसी वृत्तीनं लागलेत. तसं वागलं जातं, पण राक्षसाचा वध होतो हे लक्षात घ्या, असा इशाराही त्यांनी दिला.

ईडीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. संसदेत मुद्दाम बोललो नाही. मी कोर्टात बोलणारच आहे. भयापोटी आमच्यामागे राक्षस लावले जात आहेत. सरकार पाडण्याच्या आता नवीन १० मार्च तारीख जाहीर झालीय. अशा किती तारखा देणार आहात? जे सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा, असंही ते म्हणाले.