मुंबई : पीपीएफ (पब्लिक प्रोविडेंट फंड) सर्वात महत्वाची आणि सर्वात छोटी अशी बचत योजना आहे. आता या पीपीएफमध्ये ७.८ टक्के व्याज मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत २०१६ एप्रिलपासून पीपीएफच्या सर्व छोट्या योजनांमध्ये व्याजदर हा तिमाहीमध्ये ठरत आहे. तसेच पीपीएफचं खातं हे बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये देखील तुम्ही खोलू शकता. त्याचप्रमाणे प्रायव्हेट बँकेत देखील तुम्ही पीपीएफ अकाऊंटची सुविधा देण्यात आलेली आहे.
पोस्ट ऑफिसच्या माहितीनुसार, पीपीएफ अकाऊंट ओपन करण्यासाठी तुम्हाला फक्त १०० रुपये भरावे लागणार. या अकाऊंट ओपनिंगसाठी कॅश किंवा चेकचा वापर करू शकतो. चेकचा वापर करत असाल तर चेकवर जी तारीख असेल तिचं तारीख अकाऊंट ओपनची असणार आहे.
पीपीएफच्या या अकाऊंटमध्ये ५०० रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करू शकता. आणि मिनिमम पैसे म्हणजे अगदी ५०० रुपये देखील अकाऊंटमध्ये नसल्यास ५० रुपये दंड लागू शकतो.
पीपीएफचे अकाऊंट एकापेक्षा अधिक चालू शकत नाही. कुणीही व्यक्ती एकापेक्षा अधिक पीएफ अकाऊंट ओपन करू शकत नाही. मात्र पीपीएफ सब्सक्राइबर कोणत्याही अल्पवयीन मुलाच्या नावे अकाऊंट खोलू शकतात. मात्र त्यामध्ये दीड लाखाहून अधिक रुपये असू नयेत.
पीपीएफच्या या अकाऊंटमध्ये तुम्ही वर्षातून फक्त १२ ट्रान्जेक्शन करू शकता. त्यामुळे याची काळजी घेणं आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी काळ हा १५ वर्षाचा आहे. मात्र तुम्ही याला आणखी ५ वर्षे पुढे वाढवू शकता.
त्याचप्रमाणे जर तुम्ही पीपीएफ खात्यांमधून काही रक्कम काढू इच्छिता तर ती सुविधा देखील आहे. मात्र अकाऊंट ओपन केल्यानंतर ७ वर्षांनीच त्यातील पैसे काढण्याचे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे चौथ्या वर्षापर्यंत तुम्ही जमा झालेल्या रकमेपेक्षा फक्त ५० टक्के रक्कम काढू शकता.
त्याचप्रमाणे या पीपीएफ अकाऊंटला तुम्ही बँकेतून पोस्टात आणि पोस्टातून बँकेत ट्रान्सफर करू शकता.