तुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग 'हि' ट्रिक वापरून पाहा

Dogs Chasing Bike In Night : तुम्ही गाडी चालवत असाल किंवा नसाल देखील, त्यावेळेस तुमच्यामागे कुत्रे लागतात. कुत्रे तुमच्या मागे लावून भूकत तुमचा पाठलाग करतात. त्यामुळे अनेकांना खुप भीती वाटते. काहिंचे अशा घटनांमध्ये अपघात देखील झाले आहेत. 

Updated: Dec 17, 2022, 06:31 PM IST
तुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग 'हि' ट्रिक वापरून पाहा title=

Dogs Chasing Bike In Night : रात्री भरधाव वेगाने रस्त्यावर गाडी चालवली तर कुत्रे मागे (Dogs Chasing Bike) लागल्याच्या अथवा भूकण्याच्या अनके तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. अशा तक्रारी तुम्ही तुमच्या मित्रांकडून देखील ऐकल्या असतील. त्यामुळे अनेकांना नेमक कारण समजत नाही, की कुत्रे गाडी मागे (Dogs Chasing Bike) का लागतात? तुम्हाला माहितीय कारण? नाही ना मग चला तर जाणून घेऊयात.

तुम्ही गाडी चालवत असाल किंवा नसाल देखील, त्यावेळेस तुमच्यामागे कुत्रे लागतात. कुत्रे तुमच्या मागे लावून भूकत तुमचा पाठलाग करतात. त्यामुळे अनेकांना खुप भीती वाटते. काहिंचे अशा घटनांमध्ये अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे अशावेळेस भरधाव गाडी चालवणे (Dogs Chasing Bike) खुप चुकीचे आहे. कारण कुत्रे निव्वळ भूंकत असतात, ते तुम्हाला चावायला तुमच्या नजीक येत नसतात. 

वाहनांवर का भूकतात? 

कुत्रे दुचाकी (barking dog) असो अथवा कार असो, या दोघांच्या मागे पळत भूकत असतात. कुत्रे हे करण्या मागचे कारण म्हणजे, कुत्र्यांना त्यांच्या जवळून भरधाव वेगाने गाडी नेणे आव़डत नाही. त्यामुळे ते गाडीच्या मागे लागतात आणि भूकतात. 

कुत्रे भूकल्यास करायचं काय?

जेव्हा एखादी दुचाकी किंवा कार भरधाव वेगाने जाते, तेव्हा कुत्रे भडकतात (barking dog)  आणि भुंकायला लागतात. त्यामुळे, जर तुम्हाला कुत्र्यांनी तुमच्या दुचाकीवर रात्री भुंकावे असे वाटत नसेल, तर त्यांच्या जवळून कमी वेगाने गाडी चालवा. जर बाईक हळू करून देखील कुत्रा भुंकत असेल आणि चावायला तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल, तर घाबरू नका आणि जास्त वेगाने बाईक चालवू नका. कारण त्यामुळे अपघात होऊ शकतो. यावेळेस गाडी थांबवून कुत्र्यांना थोडा घाबरवण्याचा प्रयत्न करावा लागतो. यानंतर, हळूहळू दुचाकी पुढे सरकवा आणि तिथून निघून जा. 

दरम्यान वरील उपाय करून बघा, कदाचित तुमच्या मागे कुत्रे लागणे बंद होईल.