Salary Negotiation Tips: प्रत्येकात काहीनाकाही विशेष क्षमता असते. मात्र प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार सॅलरी पॅकेज मिळतंच असं नाही. अशात अनेकजण आपल्या नशिबाला कोसतात. मात्र, तुम्ही जर खालील महत्त्वाच्या टिप्सवर अधिक लक्ष दिलंत, तर तुम्ही HR सोबत अधिक प्रभावी पद्धतीने सॅलरी निगोसिएशन करू शकतात. जाणून घेऊयात HR सोबत वाटाघाटी करण्याच्या काही खास टिप्स.
रिसर्च - ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी जात आहात, त्या कंपनीबाबत माहिती घेणं गरजेचं आहेच. सोबतच तिच्या स्पर्धक कंपन्यांबाबत पूर्ण रिसर्च करा. स्पर्धक कंपनी तुमच्या पोस्टसाठी किती रुपये पॅकेज देतं याबाबत माहिती ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही HR सोबत निगोसिएशन करू शकाल.
कंपनीकडून कोणते लाभ मिळतात याची माहिती घेणं - प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काही विशेष सुविधा देतात. ज्या कंपनीती तुम्ही काम करायला जाणार आहात तिथे तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आहेत, याबाबत माहिती घ्या. या सुविधांमुळे तुमचे किती पैसे वाचू शकतात हे जाणून घेतल्यानंतर आणि तुम्ही त्या नोकरीबाबत विचार करू शकतात.
हातात किती रुपये पडणार हे माहित असणं गरजेचं - अनेकजण चांगलं पॅकेज मिळतंय म्हणून नोकरी स्वीकारतात. मात्र, हातात पडणाऱ्या पगाराबाबत माहिती न घेणं तुमच्या आर्थिक आरोग्यसाठी घातक ठरू शकतं. सॅलरीबाबत वाटाघाटी करताना इन हॅन्ड सॅलरी किती येणार, तुमच्या पगारातून किती PF, विमा यांची कपात होणार हे जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या HR कडून याबाबत लेखी माहिती घ्या.
तुमच्यासाठी काय महत्त्वाचं हे निश्चित करा - एखाद्या कंपनीत इंटरव्यूला जाताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्राथमिकता ठरवणं. तुम्ही तिथे पगारासाठी जात आहात की तुम्हाला आवडतं काम करायला मिळणार आहे यासाठी, हे निश्चित करणं गरजेचं.
सॅलरी लिमिट सेट करा - स्वतःसाठी तुम्ही एक लिमिट सेट करणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या विशिष्ट रकमेखाली तुम्ही नोकरी करणार नाही याबाबतचं हे लिमिट असावं. मात्र हे लिमिट अवाजवी देखील नसावं. नाहीतर तुम्हाला रिजेक्ट देखील केलं जाऊ शकतं.
how to get fat salary package tips to negotiation with HR manager