Murder Case: 2010 ला आई-वडिलांची हत्या, 2016 ला Girlfriend ची हत्या करुन घरातच...; कोर्टाने सुनावली शिक्षा

Chhattisgarh Murder Case: पोलिसांनी एका प्रकरणामध्ये तरुणाची चौकशी सुरु केली असताना त्याने यापूर्वीच्या एका धक्कादायक गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्याने दिलेला कबुली जबाब ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

Updated: Jan 31, 2023, 04:40 PM IST
Murder Case: 2010 ला आई-वडिलांची हत्या, 2016 ला Girlfriend ची हत्या करुन घरातच...; कोर्टाने सुनावली शिक्षा
Chhattisgarh Murder Case

Chhattisgarh Murder Case: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायपूर (Raipur) जिल्ह्यामधील एका व्यक्तीने आपल्या आई वडिलांबरोबरच (Parents Murder) प्रेयसीचीही हत्या (Girlfriend Murder)  केली. यानंतर या व्यक्तीने तिघांचेही मृतदेह घरामध्येच पुरले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आई-वडिलांची हत्या केल्यानंतर ही व्यक्ती तब्बल सहा वर्ष मोकाट फिरत होती. आता कोर्टाने या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपीला शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणामधील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उदयन दास नावाच्या तरुणाने 2010 साली रायपुरमध्ये आपल्या आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्याने दोघांचेही मृतदेह आपल्या डीडी नगरमधील घरामागील अंगणात पुरले. उदयनने 2016 साली आपल्या प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी उदयनला भोपाळमधील घरातून अटक केली. प्रेयसीच्या हत्येनंतर तपासादरम्यान उदयनने आई-वडिलांच्या हत्येची कबुली दिली. 

कोण होती ही तरुणी?

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे राहणाऱ्या आकांक्षा उर्फ श्वेताची 2007 साली उदयनबरोबर ओळख झाली. जून 2016 मध्ये श्वेता घर सोडून नोकरीसाठी भोपाळला आली. त्यानंतर ती साकेत नगरमध्ये उदयनबरोबर एकाच घरात राहू लागली. श्वेताने तिच्या कुटुंबियांना ती अमेरिकेमध्ये नोकरी करते असं सांगितलं होतं. जुलै 2016 नंतर श्वेताचा तिच्या कुटुंबियांबरोबरच संपर्क तुटला. त्यानंतर श्वेताच्या भावाने तिचा क्रमांक भोपाळमध्ये ट्रॅक केला.

कुटुंबाने व्यक्त केली शंका

उदयनबरोबर श्वेता लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती अशी शंका व्यक्त करताना श्वेताच्या कुटुंबियांनी डिसेंबर 2016 मध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर सुरु झालेल्या तपासादरम्यान उदयनने श्वेताची हत्या करुन तिचा मृतदेह एका मोठ्या पेटीत भरुन घरातील बेडरुममध्येच पुरल्याची माहिती समोर आली. मृतदेह पुरल्यानंतर त्यावर काँक्रीटचा कठडाही उदयनने बनवला होता.

नवा धक्कादायक खुलासा

श्वेताच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर हे प्रकरण इथं संपलं असं पोलिसांना वाटलं. मात्र तपासादरम्यान उदयनने 2010 साली आपली आई इंद्रायणी आणि वडील व्ही. के. दास यांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने हे मृतदेह अंगणात पुरल्याची माहिती दिली. हे ऐकून पोलिसांनाच धक्का बसला.

600 पानांची चार्टशीट

बांकुरा पोलिसांनी 30 एप्रिल 2017 रोजी उदयनविरोधात 600 पानांची चार्टशीट कोर्टामध्ये दाखल केली. 19 साक्षीदार आणि अनेक पुराव्यांच्या आधारे उदयनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.